• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरजेतील “त्या” प्रकरणात ५० जणांविरुद्ध गुन्हा दाखल..!

Admin by Admin
January 4, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
मिरजेतील “त्या” प्रकरणात ५० जणांविरुद्ध गुन्हा दाखल..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मिरज :खबऱ्या प्रतिनिधी/ मिरजेत सोमवारी रात्री जवाहर चौक व गोठण गल्ली परिसरात किरकोळ कारणावरून दोन गटात वाद होऊन जमावाने परस्परांवर तुफान दगडफेक केली. यावेळी चारचाकी व दुचाकी वाहनांची मोडतोड करण्यात आली.

याबाबतची माहिती मिळताच घटनास्थळी धावलेल्या पोलिसांनी लाठीमार करून जमावाला पांगवले. याबाबत परस्परविरोधी तक्रारींवरून नगरसेविका पुत्रासह दोन्ही गटाच्या सुमारे ५० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिरजेतील जवाहर चौकात एका अपार्टमेंटमध्ये बाहेरील तरुण वारंवार येत असल्याने तेथील रहिवाशाने त्यास मारहाण केली. यामुळे शंभर जणांच्या जमावाने तेथे धाव घेतली. दुसरा गटही समोरासमोर आल्यानंतर परस्परांवर दगड-विटांनी हल्ला चढविण्यात आला. काठ्या व बॅटने मारहाण करण्यात आली. यावेळी चौकात व रस्त्यावर थांबलेल्या दुचाकी व चारचाकी वाहनांचीही जमावाने मोडतोड केली.

दोन्ही गटांकडून जोरदार दगडफेक व जमावाच्या दहशतीमुळे मोठा तणाव निर्माण झाला होता. याबाबत माहिती मिळाल्यानंतर शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजीव झाडे, सहायक पोलिस निरीक्षक नितीन सावंत, सुशील मस्के, सचिन सनदी यांच्यासह पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेत लाठीमार करून जमावाला पिटाळले. पोलिसांच्या आक्रमक पवित्र्यामुळे जमाव पांगला.

दगड, चपलांचा खच

जवाहर चौक व गोठण गल्ली परिसरात दगड व चपलांचा खच पडला होता. पोलिसांनी दंगेखोरांची सुमारे २० दुचाकी वाहने ताब्यात घेतली. शहरात मोठ्या प्रमाणात दगडफेक करून दहशत निर्माण केल्यानंतरही दोन्ही गटांनी आपापसात तडजोडीचे धोरण स्वीकारल्याने मंगळवारी सायंकाळपर्यंत पोलिसांत फिर्याद दाखल झाली नव्हती. मात्र पोलिसांनी कठोर पवित्रा घेतल्यानंतर सलीम सय्यद व अस्लम काझी यांनी परस्परांविरुद्ध दंगल व मारामारीची फिर्याद दिली. त्यानुसार मिरजेतील राष्ट्रवादीच्या नगरसेविकेचा पुत्र आझम काझी यांच्यासह दोन्ही गटाच्या सुमारे ५० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

मिरज परिसरात अपघातानंतर कार पेटली; कुटुंब बचावले..

Next Post

ब्रेकिंग : महावितरणचा संप मागे; उपमुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीला यश..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
जयंतरावांना एकनाथ शिंदे सरकारचा आणखी एक धक्का ; “जिल्हा मध्यवर्ती बँकेतील…….!”

ब्रेकिंग : महावितरणचा संप मागे; उपमुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीला यश..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group