• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

भाऊ जिल्हाधिकारी( IAS ) तर बहीण पोलीस उपअधीक्षक ( IPS ) , एकाच जिल्ह्यात सांभाळतायत पदभार..

Admin by Admin
November 9, 2022
in पश्चिम महाराष्ट्र, विशेष
1 min read
0
भाऊ जिल्हाधिकारी( IAS ) तर बहीण पोलीस उपअधीक्षक ( IPS ) , एकाच जिल्ह्यात सांभाळतायत पदभार..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

काहींचं असं असतं, की एकदा ध्येय ठरलं की मग मागे हटणं त्यांना जमत नाही. मग घरातील दोन व्यक्ती सुद्धा जिद्दीच्या जोरावर मोठ्या पदावर कार्यरत होऊ शकतात. मोठी अधिकारी बनू शकतात. हे करून दाखवलं आहे दोन भाऊ बहिण यांनी.

साताराच्या नव्या पोलीस उपअधीक्षक पदी लेडी सिंघम IPS आंचल दलाल यांची वर्णी लागलेली आहे. कारण सातारा जिल्ह्यामध्ये नुकतीच पोलीस उपअधीक्षक श्री. समीर शेख यांची बदली झाली आणि या पदाचा कार्यभार आयपीएस आंचल दलाल यांनी स्वीकारला.

त्यात विशेष म्हणजे आंचल दलाल या सातारा जिल्हाधिकारी श्री. शेखर_सिंह यांच्या बहिण आहेत. २०१७ च्या युपीएससी परीक्षेत १३६ व्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन त्यांची आयपीएससाठी निवड झाली. त्यांनी यासाठी खूप तयारी आणि संघर्ष केलेला आहे. त्या सोबतच याआधी त्यांनी रेल्वे मध्ये सुद्धा अधिकारी म्हणून काम केलेलं आहे.

आंचल दलाल या मूळच्या उत्तर प्रदेशातील शामली या जिल्ह्यातील आहेत. आयपीएस म्हणून निवड होण्याआधी त्यांनी नागपूर येथे भारतीय रेल्वेतही कार्यभार पाहिला होता. कारण त्यांचं असं मत होतं की जोपर्यंत ध्येय पूर्ण होत नाही, तोपर्यंत दुसरीकडे काम म्हणून मी रेल्वेत ही अधिकाऱ्याची नोकरी केली. तसेच सातारा च्या आधी आयपीएस म्हणून पुणे विभाग व इतर ठिकाणी कार्यभार सुद्धा पाहिला आहे. त्यांचा गुन्हेगारी प्रवृत्ती असणाऱ्यावर खूप जबरदस्त वचक आहे. गुन्हेगार त्यांच्या नावाने थरथरतात. खरचं अधिकारी असावेत तर असेच.

दोघे भाऊ बहीण एकाच जिल्ह्यात येण्याचा योग खूप कमी प्रमाणात येत असतो. त्याप्रमाणे भाऊ आणि बहीण मिळून आता साताऱ्याच्या सेवेत बरच काही सकारात्मक कामे करतील यात काही शंका नाही.

पदभार स्वीकारल्यानंतर आंचल दलाल काय म्हणाल्या ?…

आयएएस परीक्षा म्हणजे मॅरेथॉन सारखी आहे. या स्पर्धेसाठी अभ्यासात सातत्य असले पाहिजे. तुमची कष्ट करण्याची तयारी असल्यास तुम्ही यशस्वी होऊ शकता. स्मार्ट हार्डवर्कची आवश्यकता आहे. तसेच त्यासोबत सतत जागतिक अमुक-तमुक घडणाऱ्या गोष्टी पुस्तकांच्या माध्यमातून आणि माहिती च्या माध्यमातून आपण वाचल्या पाहिजेत.

यासाठी मी सातारा मध्ये स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या युवक-युवतींसाठी पुस्तके उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासोबत सातारा जिल्ह्यासाठी सुरक्षेच्या बाबतीत जेवढे काही काम करता येईल तेवढे मी माझ्या कार्यकाळात करणार आहे.

खरचं अश्या प्रगल्भ विचारांच्या अधिकारी असलेल्या, आंचल दलाल आणि भाऊ शेखर सिंह ” यांना टीम गोपनीय खबऱ्याचा चा कडक सलाम !…

Previous Post

… अखेर वाळू तस्करांवरील कारवाईचा ‘दर’ ठरला

Next Post

मिरजेतील व्यापाऱ्याला तीन महिने तुरुंगवास

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
ब्रेकिंग | मनसे जिल्हाध्यक्षासह १६ जणांवर गुन्हा दाखल

मिरजेतील व्यापाऱ्याला तीन महिने तुरुंगवास

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group