• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

शरद पवारांच्या विरुद्ध पुन्हा रान पेटलं,अहिल्यादेवी स्मारक लोकार्पणावरून पडळकर, खोत उतरले रस्त्यावर.

Admin by Admin
March 27, 2022
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
शरद पवारांच्या विरुद्ध पुन्हा रान पेटलं,अहिल्यादेवी स्मारक लोकार्पणावरून पडळकर, खोत उतरले रस्त्यावर.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली : खबऱ्या प्रतिनिधी / भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand padalkar) यांनी पुन्हा एकदा शरद पवारांविरुद्ध (Sharad Pawar ) रान पेटवलं आहे.

कालचा दिवस किरीट सोमय्या आणि निलेश राणे यांनी गाजवल्यानंतर आजचा दिवस गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत गाजवत आहेत. सांगलीतल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Ahilyadevi Holkar) यांच्या पुतळ्याच्या लोकार्पणाचा वाद पेटला आहे. शरद पवारांच्या हस्ते लोकार्पण करण्यास भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी कडाडून विरोध केला आहे. त्यांच्या खांद्याला खांदा लावून सदाभाऊ खोतही पूर्ण ताकदीनिशी रस्त्यावर उतरले आहेत. पिवळे झेंडे घेऊन भाजप कार्यकर्त्यांनी सांगलीला आज पिवळं रुप दिलंय. ज्या शरद पवरांनी गोरगरिबांची फसवणूक केली. त्या पवारांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण होऊ नये अशी आक्रमक भूमिका पडळकरांनी घेतली आहे. पुतळ्याच्या लोकार्पणासाठी हजारो कार्यकर्ते पुतळ्याकडे पोहचण्याचा प्रयत्न करत आहेत.

आम्ही उद्घाटन करणारच-पडळकर

सदाभाऊ खोत यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर जोरदार टीका केली आहे. सांगली जिल्ह्याशी काही संबंध नसताना शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन नको, त्यातर इतर स्थानिक नेत्यांची नावं वगळ्याचा आरोपही त्यांनी केला आहे. तसेच आतापर्यंत तुम्ही किती उद्घाटन केली कंटाळा आला नाही का ? असा खोच क सवाल सदाभाऊ खोत यांनी पवारांना केला आहे. आम्ही आता सिक्सच मारणार आणि उद्घाटन करणार, कितीही पोलीस बळाचा वापर केला तरी उद्घाटन होणारच अशी ठाम भूमिका गोपीचंद पडळकर यांनी घेतली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा पुतळ्याचा वाद पेटला आहे.

पडळकर काय म्हणाले?

आम्ही आमच्या परंपारिक पद्धतीने इथे आलो आहे. धनगरी नृत्यही यावेळी सादर करण्यात येणार आहे. हा आमच्यासाठी ऐतिहासिक क्षण आहे. हा लोकार्पण सोहळा आमच्या मंढपाळांच्या हस्ते पार पडणार आहे. मात्र अशा मेंढपाळांना सरकार विरोध करून पद मोठी मनं छोटी याचे दर्शन घडवत आहेत. असा हल्लाबोल गोपीचंद पडकर यांनी केला आहे. आम्ही पोलिसांना घाबरणार नाही, पोलिसांनी अडवूनही एवढे लोक याठिकाणी पोहोचले, हे उद्घाटन महाराष्ट्र बघेल असे थेट आव्हान गोपीचंद पडळकर यांनी दिलंय. ही कारस्थानं पालकमंत्री जयंत पाटील यांचं आहे. त्यांचं आयुष्य याच्यात गेलं. त्यामुळे त्यांना उद्घाटनाला बोलवणार नाही, आमचे लोक आहेत, त्यांचं आम्ही स्वागत करतो असे म्हणाले आहेत.

Previous Post

थेट बारामतीत १२ खासदार , शरद पवार यांच्या भेटीला

Next Post

आम्ही आता सिक्सच मारणार आणि उद्घाटन करणार – सदाभाऊ खोत

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
आम्ही आता सिक्सच मारणार आणि उद्घाटन करणार – सदाभाऊ खोत

आम्ही आता सिक्सच मारणार आणि उद्घाटन करणार - सदाभाऊ खोत

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group