• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

तंबाखूची गाडी,धाडी टाकून केल्या दोनदा तोडी’, 

सुगंधित तंबाखूने खाल्ली दोन पोलिसांची नोकरी, पाच लाखांची तोड पडली महागात

Admin by Admin
March 27, 2022
in क्राईम
1 min read
0
तंबाखूची गाडी,धाडी टाकून केल्या दोनदा तोडी’, 
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नागपूर – सुगंधित तंबाखूचे वाहन पकडून संबंधित व्यापाऱ्याकडून पाच लाखांची तोडी करणे दोन पोलिसांना चांगलेच महांगात पडले.

पोलीस उपायुक्त मनीष कलवानिया यांनी कळमना ठाण्यातील त्या दोन पोलिसांना निलंबित केले. सचिन दुबे आणि दिनेश यादव अशी या दोघांची नावे आहेत.

दोन आठवड्यांपूर्वी या दोघांनी अग्रवाल नामक सुगंधित तंबाखू विकणाऱ्या व्यापाऱ्याचे वाहन पारडी भागात पकडले. राज्यात सुगंधित तंबाखू विकणे आणि बाळगणे प्रतिबंधित आहे. संबंधित अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई करण्याऐवजी ‘दोन पेटी’ घेऊन ते वाहन मालासह सोडून दिले. मात्र, या दोन लाखांऐवजी ३० हजार मिळाल्याचे सांगून एकाने बाकीची रक्कम गिळंकृत केली. आपल्याला हलक्यात निपटवल्याचे कळाल्याने दुसरा चिडला. त्याने दुसऱ्या दिवशी पुन्हा भरतवाड्यात अग्रवालचे वाहन पकडले आणि तीन पेटी घेतल्या.

एवढेच नव्हे तर त्याने पोलीस ठाण्यात येऊन आपण कशी मोठी तोडी केली, त्याबाबत आरडाओरडही केली. यामुळे ठाण्यातील जुने-जाणते दुखावले. त्यांनी ही बातमी फोडली. खबऱ्याने १६ फेब्रुवारीला ‘तंबाखूची गाडी, कळमन्यात दोनदा तोडी’ असे शिर्षक देऊन दुहेरी तोडीचा प्रकार उजेडात आणला. त्या वृत्ताची पोलीस उपायुक्त मनीष कलवानिया यांनी गंभीर दखल घेतली. बारकाईने चौकशी करून उपायुक्त कलवानिया यांनी या दोघांचा दोषी अहवाल पोलीस आयुक्तांना कळविला. त्यानंतर शुक्रवारी या दोघांवर निलंबनाचे आदेश बजावण्यात आले.

कळमन्यात भूकंप…

एकाच वेळी दोघांचे निलंबन झाल्याने कळमना पोलीस ठाण्यात भूकंपाचे वातावरण निर्माण झाले आहे. आता कुणाचा नंबर, अशी चर्चा पोलीस ठाण्यात सुरू आहे.

Previous Post

जयंतरावांनी मागणी केली, गडकरींनी ग्वाही दिली, म्हणाले, फाटक लावून विमान उतरेल….

Next Post

लेका मानलं तुला…! शेतकरी बापाची इच्छा पूर्ण करण्यासाठी शेतकरी पुत्र फौजदार झाला; वाचा शेतकरी पुत्राची यशोगाथा

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
लेका मानलं तुला…! शेतकरी बापाची इच्छा पूर्ण करण्यासाठी शेतकरी पुत्र फौजदार झाला; वाचा शेतकरी पुत्राची यशोगाथा

लेका मानलं तुला…! शेतकरी बापाची इच्छा पूर्ण करण्यासाठी शेतकरी पुत्र फौजदार झाला; वाचा शेतकरी पुत्राची यशोगाथा

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group