• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सोमय्या व राणें पोलिसांच्या ताब्यात ..? वाद चिघळला पोलीस स्टेशनबाहेर कार्यकर्त्यांची घोषणाबाजी, पोलिस- कार्यकर्ते यांच्यात झटापट.

Admin by Admin
March 26, 2022
in राजकीय
1 min read
0
सोमय्या व राणें पोलिसांच्या ताब्यात ..? वाद चिघळला पोलीस स्टेशनबाहेर कार्यकर्त्यांची घोषणाबाजी, पोलिस- कार्यकर्ते यांच्यात झटापट.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

दापोली ; खबऱ्या ऑनलाइन : दापोली येथील मंत्री अनिल परब यांच्या रिसॉर्टवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी माजी खासदार किरीट सोमय्या आणि निलेश राणे दापोलीत दाखल झाले.

यावेळी त्यांच्यासोबत शेकडो कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी करत त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर आगपाखड केली. हिंम्मत असेल तर थांबवून दाखवा; पोलिसांना कशाला पाठवून देता, असे म्हणत सोमय्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.

ते पुढे म्हणाले की, मी उद्धव ठाकरेंना थेट आव्हान देतो; हिंम्मत असेल तर कारवाई रोखून दाखवा. चार राज्यातील निवडणुका जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदींनी सांगितले होते देशातील भ्रष्टाचार संपवणार. त्यापद्धतीने आम्ही काम करत आहे. मी दापोलीत येऊन अनिल परब यांचे रिसॉर्ट तोडून टाकणार आहे. ते तुम्ही वाचवून दाखवा. परब यांचे रिसॉर्ट मी तोडल्याशिवाय शांत बसणार नाही, असे आव्हान सोमय्यांनी दिले.

परब यांनी मिळवलेली संपत्ती आली कोठून याचा तपास लावल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. हिंम्मत असेल तर आमच्याशी लढा; पोलिसांना कशाला पाठवून देता. मी परब यांचे रिसॉर्टसह त्यांचा २५ कोटींचा घोटाळा बाहेर काढणार आहे. ठाकरे सरकारचे सगळे घोटाळे बाहेर काढल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नसल्याचे सोमय्या यांनी सांगितले.

दरम्यान सोमय्या आणि राणे यांच्यासोबत कार्यकर्त्यांनी दापोली पोलिस स्थानक गाठले. यावेळी किरीट सोमय्या पोलिसांसोबत स्थानकात गेल्याने काही काळ तणावाचे वातावरण झाले होते. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. यावेळी निलेश राणे आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. याचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे.

Previous Post

८ वी पास विद्यार्थ्यांना मोठी संधी, मेल मोटर सर्व्हिस अंतर्गत भरती

Next Post

दापोलीत हायव्होल्टेज ड्रामा ! किरीट सोमय्या, निलेश राणे यांना अटक, जिल्ह्याबाहेर सोडणार

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
दापोलीत हायव्होल्टेज ड्रामा ! किरीट सोमय्या, निलेश राणे यांना अटक, जिल्ह्याबाहेर सोडणार

दापोलीत हायव्होल्टेज ड्रामा ! किरीट सोमय्या, निलेश राणे यांना अटक, जिल्ह्याबाहेर सोडणार

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group