• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

घरपट्टी थकबाकीदारांची नावं चौकात झळकणार..!

Admin by Admin
September 22, 2022
in पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
घरपट्टी थकबाकीदारांची नावं चौकात झळकणार..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली : खबऱ्या प्रतिनिधी / घरपट्टीच्या थकबाकीदार मालमत्ताधारकांची यादी तयार करून घर टू घर वसुली मोहिम राबविण्याबरोबरच बड्या थकबाकीदारांची यादी चौकात लावली जाणार आहे. महापालिकेतील बैठकीत बुधवारी हा निर्णय घेण्यात आला.

स्थायी समितीचे सभापती धीरज सूर्यवंशी, उपायुक्त राहुल रोकडे यांच्या उपस्थितीत घरपट्टी विभागाची बैठक झाली होती. बैठकीला सभागृह नेते विनायक सिंहासने, सहाय्यक आयुक्त नितीन शिंदे, नगरसेवक संजय कुलकर्णी, प्रकाश ढंग उपस्थित होते.सूर्यवंशी म्हणाले, महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक आहे. विकासकामाबरोबरच पगारालाही निधी कमी पडत आहे. त्यासाठी घरपट्टी वसुलीची मोहिम हाती घ्या. प्रत्येक भागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना वसुलीचे टार्गेट द्या, लोक कर भरायला तयार आहेत, त्यांना जागेवरच पावती हवी असते. त्यासाठी आधुनिक तंज्ञांचा वापर करुन कर वसुलीवर भर द्यावा. बड्या थकबाकीदारांचे फलक चौकात लावण्याची सूचनाही त्यांनी केली.

उपायुक्त राहुल रोकडे म्हणाले, प्रत्येक प्रभागाचे कर वसुलीचे टार्गेट ठरवून नियोजन करा. कर्मचार्यांना अडचणी सोडविल्या जातील. घंटागाडीवरुनही घरपट्टी भरण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.

नितीन शिंदे म्हणाले, महापालिकेचा पगार घेऊन काम करतो. कर वसुली करताना तशी तळमळ दिसू द्या. प्रत्येक प्रभागातील कर्मचार्याने बड्या थकबाकीदारांची यादी तयार करावी. मिरजेतील आंबेडकर उद्यान, सांगलीतील विजयनगर, सांगलीवाडी, बापट मळा, प्रभाग समिती दोनचे कार्यालय या ठिकाणी घरपट्टी संकलनाचे कार्यालय सुरु केले आहे.

केवळ ११ कोटीची वसुली

महापालिकेची मार्चअखेर ११० कोटीची कर वसुलीचे उद्दीष्ट आहे. २० सप्टेंबर अखेर केवळ ११ कोटीची वसूली झाली आहे. ६१ कोटी थकबाकी, तर चालू मागणी ४८ कोटी आहे.

Previous Post

नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर पातळीसाेडून टीका!

Next Post

कुपवाड – विजयनगर मार्गावरील नाला उघडा : महापालिकेला काय साध्य करायचं आहे .? सहावा अपघात : नागरिक संतप्त.

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
कुपवाड – विजयनगर मार्गावरील नाला उघडा : महापालिकेला काय साध्य करायचं आहे .? सहावा अपघात : नागरिक संतप्त.

कुपवाड - विजयनगर मार्गावरील नाला उघडा : महापालिकेला काय साध्य करायचं आहे .? सहावा अपघात : नागरिक संतप्त.

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group