• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ओरिजिनल मुख्यमंत्र्यांना वेळ नाही, डमी शिंदे साहेब तुम्ही तर शेतकरीप्रश्नांवर मार्ग काढा..

Admin by Admin
September 13, 2022
in पश्चिम महाराष्ट्र, मंत्रालय
1 min read
0
ओरिजिनल मुख्यमंत्र्यांना वेळ नाही, डमी शिंदे साहेब तुम्ही तर शेतकरीप्रश्नांवर मार्ग काढा..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

स्वाभिमानी युवा आघाडीचे राज्य प्रवक्ते रणजित बागल यांचे डमी मुख्यमंत्र्यांना निवेदन

सोलापूर :खबऱ्या प्रतिनिधी/ राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या राजकीय दौर्‍यांमध्ये व्यस्थ आहेत. त्यांना मंत्रीमंडळ बैठका घेण्यास पंधरा पंधरा दिवस वेळ मिळत नाही. त्यामुळे राज्यातील सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यास अडचणी येत आहेत. आता याच मुद्द्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते रणजित बागल यांनी चक्क एकनाथ शिंदे यांच्यासारखे हुबेहुब दिसणारे डमी मुख्यमंत्री म्हणून प्रसिद्ध झालेले पंढरपूर येथील पांडुरंग शिंदे यांना प्रतिकात्मक निवेदन दिले आहे.

यावेळी बोलताना बागल म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री महोदय सध्या राजकीय दौर्‍यामध्ये प्रचंड व्यस्थ आहेत, त्यामुळे त्यांना शेतकर्‍यांच्या प्रश्नांविषयी लक्ष देण्यास कदाचित वेळ मिळत नसावा.

मंत्रालयासमोर एका शेतकऱ्याने आत्महत्या करून ही राज्याचे मुख्यमंत्री शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर गंभीर नाहीत. ते मागच्या पंधरा दिवसांत फक्त गणपती आरत्या आणि आपल्या गटाचे आमदार महोदय यांचेसोबत भोजन कार्यक्रमात व्यस्त आहेत.

आज अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या समस्या मांडायच्या कुठे..? म्हणुन आज डमी मुख्यमंत्र्यांकडे प्रतिकात्मक पध्दतीने लोकांचे प्रश्न सोडवण्याची मागणी केली आहे.

पुढे बोलताना बागल म्हणाले, राज्यात सध्या जनावरांवर आलेल्या लंपी स्कीन रोगाने हाहाकार माजवला आहे, शिवाय राज्यभरात अनेक भागात तीव्र अतिवृष्टी व काही भागात अवर्षण झाले आहे. मात्र पिकविमा कंपनीने पर्जन्यमानात घोळ करून शेतकर्‍यांना पिकविम्यापासून वंचित ठेवण्याचा डाव आखला आहे.

याबाबत मुख्यमंत्री महोदय मात्र कठोर नाहीत. ते गंभीर नाहीत म्हणून निदान डमी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केल्यावर तरी ओरिजिनल मुख्यमंत्री दखल घेतील ही अपेक्षा यानिमित्ताने बागल यांनी व्यक्त केली आहे.

Previous Post

शाखाधिकाऱ्याचे पितळ उघडं पडूनही संचालक मंडळाची मेहेरनजर..!

Next Post

जिल्हा मध्यवर्ती बँकेत बदल्यांवरुन संचालकांमध्ये मतभेद : कामकाज विस्कळीत होण्याचा धोका..?

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
जिल्हा मध्यवर्ती बँकेत बदल्यांवरुन संचालकांमध्ये मतभेद : कामकाज विस्कळीत होण्याचा धोका..?

जिल्हा मध्यवर्ती बँकेत बदल्यांवरुन संचालकांमध्ये मतभेद : कामकाज विस्कळीत होण्याचा धोका..?

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group