मुंबई : खबऱ्या प्रतिनिधी : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंड केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. अशातच सत्तांतर होण्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळात सुरु असताना शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी एक ट्विट केले आहे त्यामुळे महाविकास आघाडी सरकार पडणार का ? या गोष्टीला आणखी ऊत आला आहे.
महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधान सभा बरखास्तीचया दिशेने..
— Sanjay Raut (@rautsanjay61) June 22, 2022
” महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधान सभा बरखास्तीच्या दिशेने.” असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे. त्यामुळे आता खरंच विधानसभा बरखास्त होणार का ? याबाबत चर्चा सुरु झाली आहे. यापूर्वी जेव्हा जेव्हा महाविकास आघाडी सरकार पडणार असे विरोधकांकडून म्हंटल जायचं तेव्हा संजय राऊत या गोष्टीला कधीच मान्य नसायचे. हे सरकार टिकणार असेच ते म्हणायचे . मात्र आता संजय राऊत यांनी सूचक ट्विट केले आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारचे काउंट डाऊन सुरु झाले असल्याची जोरदार चर्चा आहे.

