• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

शिवसेनेत खळबळ! मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे टेन्शन वाढले; मंत्री एकनाथ शिंदेंसह १३ आमदार नॉटरिचेबल : राजकीय ‘स्फोट’ होण्याची शक्यता.?

Admin by Admin
June 21, 2022
in राजकीय
1 min read
0
शिवसेनेत खळबळ! मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे टेन्शन वाढले; मंत्री एकनाथ शिंदेंसह १३ आमदार नॉटरिचेबल : राजकीय ‘स्फोट’ होण्याची शक्यता.?
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : खबऱ्या प्रतिनिधी : राज्यसभेनंतर विधान परिषद निवडणुकीतही भारतीय जनता पार्टीने महाविकास आघाडीला धक्का दिला आहे.

भाजपाचे पाचही उमेदवार प्रचंड मतांनी निवडून आले आहेत. पाचवा उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपाकडे पुरेसं संख्याबळ नव्हतं. असं असूनही भाजपाने विजय खेचून आणला आहे. सत्ताधारी महाविकास आघाडीला हा खूप मोठा धक्का मानला जात आहे. महाविकास आघाडीचे अनेक आमदार फुटल्याची माहिती देखील समोर येत आहे.

विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार सचिन आहिर आणि आमश्या पाडवी विजयी झाले. मात्र या विजयानंतर सचिन आहिर वगळता शिवसेनेच्या एकही बड्या नेत्याने माध्यमांशी संवाद साधला आहे.

तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे शिवसेना नेते एकनाथ शिंदे या संपूर्ण प्रक्रियेपासूनच अलिप्त असल्याचं सोमवारी दिवसभरात दिसून आलं. मात्र आता एकनाथ शिंदे यांच्यासह १३ आमदार नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली आहे.

एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील काही आमदार संपर्काच्या बाहेर असल्याची कुणकुण लागताच वर्षा बंगल्यावर लागताच सर्व आमदारांची बैठक बोलावण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले.

मुंबई आणि आसपसच्या आमदारांनी तर रात्रीच वर्षावर बंगल्यावर हजेरी लावली. मध्यरात्री दोन वाजेपर्यंत ही बैठक सुरू होती.

शिवसेनेतली धुसफूस लक्षात येताच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील वर्षा या निवासस्थानी जाऊन उद्धव ठाकरेंशी चर्चा केली. एकनाथ शिंदे आणि इतर आमदारांना संपर्क करण्याचा प्रयत्न रात्री उशिरापर्यंत सुरू होता, अशी माहिती समोर येत आहे.

दरम्यान, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व आमदारांची दुपारी १२ वाजता बैठक बोलावली आहे. या बैठकीत एकनाथ शिंदे यांच्यासह इतर आमदार हजेरी लावणार का, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, राज्यसभेप्रमाणे विधान परिषदेची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. महाविकास आघाडी आणि भाजप या दोघांनी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. या निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे उमेदवार विजयी झाले. या निवडणुकीत सर्वांत मोठा धक्का काँग्रेसला बसला.

काँग्रेसचे भाई जगताप विजयी झाले तर चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला. खरे पाहता काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे सेफ उमेदवार मानले जात होते.

भाई जगताप आणि भाजपच्या प्रसाद लाड यांच्यात खरी लढत झाल्याचे सांगितले जात होती. मात्र, प्रत्यक्षात भाई जगताप यांचा विजय झाला आणि चंद्रकांत हंडोरे यांना पराभवाचा मोठा धक्का बसला.(स्रोत:लोकमत)

Previous Post

म्हैसाळ आत्महत्या प्रकरण : सुसाईड नोटने वाढवली प्रकरणाची व्याप्ती ; २५ जणांविरोधात गुन्हा दाखल, ११जणांना घेतलं ताब्यात…! पोलिसांना मिळाली गूढ उकलणारी माहिती..?

Next Post

महाराष्ट्राच्या राजकारणाची ‘सुरत’ बदलली ? गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रातील सेनेचे चारही आमदार बंडात..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
महाराष्ट्राच्या राजकारणाची ‘सुरत’ बदलली ? गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रातील सेनेचे चारही आमदार बंडात..

महाराष्ट्राच्या राजकारणाची 'सुरत' बदलली ? गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रातील सेनेचे चारही आमदार बंडात..

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group