
महाराष्ट्राच्या स्वाभिमानी मातीमध्ये ‘स्त्री’ ला समाजात मान सन्मान मोठ्या प्रमाणात दिला जातो. स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या संस्कारमय वातावरणात घडवताना जिजाऊंनी खूप संघर्ष केलाय. सांगली जिल्ह्याला सुद्धा ऐतिहासिक वारसा आहे. याच सांगली जिल्ह्यात स्वर्गीय गानसम्राज्ञी लता दीदी मंगेशकर, सिने अभिनेत्री सई ताम्हणकर ,स्मृती मानधना घडल्या. यांच्यासारख्या माता भगिनींनी जिल्ह्याची उंची वाढवली.

तर राजकारणात शालिनीताई पाटील, स्वर्गीय मदन भाऊ यांच्या अर्धांगिनी जयश्री वहिनी, राज्याचे माजी गृहमंत्री स्व. आर आर आबा पाटील यांच्या सहचारिणी तासगावच्या विद्यमान आमदार श्रीमती सुमनताई पाटील यांच्यासहित मिरज तालुक्यातील सलगरेच्या माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्रीताई तानाजी पाटील, माजी जि. प.अध्यक्षा प्राजक्ता ताई कोरे यांच्यासाहित विद्यमान -आजी- माजी सर्व महिला नगरसेविकांनी आपल्या कार्याचा राजकारणात वेगळाच ठसा उमटवला आहे.
खवळलेल्या वादळी समुद्रातून संकटाच्या लाटा झेलत आपल्या जहाजाला आणि सहप्रवाश्याना सुखरूप पणे किनाऱ्यावर नेण्याचे कसब अगदी मोजक्याच कप्तानांकडे असते, असं जहाज आणि सहप्रवासी जरी लाटांच्या संकटात फसले तरी त्या संकटांना सामोरे जाण्याच्या धाडसाने आणि कौशल्याने ते सहीसलामत वाचत असतात, कारण यासाठी अद्भूत शक्ती , निर्णय क्षमता आणि धाडस करणारेच व्यक्तिमत्व लागते, असेच एक व्यक्तिमत्त्व म्हणजे ‘ती’ चा जागर वृत्तवाहिनीच्या संचालिका शर्वरी पवार याच आहेत.

शर्वरी ताईंच्या आयुष्यातील प्रवास पाहता खरचं कौतुकास पात्र आहे. आता त्या सांगलीतील राजकारणात पाऊल टाकताहेत म्हणे, धाडसी महिला म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. शर्वरीताई म्हणजे असामान्य, अलौकिक प्रतिभा संपन्न व्यक्तिमत्व आहेत. जिल्ह्याच्या पत्रकारिता क्षेत्राच्या क्षितीजावर प्रेषितांच्या दैदिप्यमान पोषाखात त्या अवतरल्या आणि ‘ती’ चा जागर या वृत्त वाहिनीच्या माध्यमातून महिलांसाठी न्याय हक्काची,विकासाची चळवळ उभारली. ही चळवळ जिल्ह्याच्या वाडी-वस्तीत विदीर्ण जीवन व्यथित करणाऱ्या भोळ्या- भाबड्या माणसांत असलेल्या शक्तींना नवा जन्म देणारी ठरली, इथल्या माणसांचे आत्मभान जागृत झाले अन ह्याच जागृत आत्मभानाने जगण्यासाठी धडपडणाऱ्या गावगाडा राखणाऱ्या महागाईच्या खाईत जीवन जगणाऱ्या जीवांना माणूसपण मिळवून दिले.

पत्रकारिता क्षेत्रातील सुत्रे हाती घेतल्या पासून माझ्या जीवलग सहकाऱ्यांची, वाचकांची, आणि पीडित अन्यायग्रस्त महिलांची सफर कशी असेल ह्याचे ‘निलचित्र’ अमृताची पैज जिंकणा-या शर्वरी ताईंनी अत्यंत कल्पकतेने रंगवले आणि या साऱ्यांच्या विकासाचा आकृतीबंध त्यांनी डोळ्यासमोर ठेवला नव्हे तर तो साकारण्यासाठी त्यांनी आपले प्रतिभाशाली नेतृत्व पणाला लावून कटिबद्ध झाल्या.
पत्रकारितेमधील काही रोगट मुल्यावर आपल्या धाडसाच्या आणि संघर्षाच्या निर्णयातून त्यांनी प्रकाश टाकला.समाजाला बदनामीच्या ज्वलजहालातून होरपळून निघाल्यानंतरही यशस्वी होऊ शकतो याची विधायक दृष्टी दिली. रचनात्मक पद्धतीने महिलांसाठी समाज उभारणीचा पाया रचला. पीडित, अन्यायग्रस्त आणि प्रत्येक वेळी अपमानास्पद वागणूक मिळणाऱ्या महिलांच्या गरजा, समस्या, इत्यादी मुल्यांचा चिकीत्सक पद्धतीनं अभ्यास केला आणि माता भगिनींना विकासाचा मार्ग दाखवला.

शर्वरी ताई यांच्याकडे अशा जीवन व्यथित झालेल्या महिलांना कोणत्या दिशेनं न्यायचं ह्याचं जाणतं भान आहे. ते त्यांच्या विचारात अन कृतीत आहे.त्या अव्वल दर्जाच्या मुत्सद्दी आणि दृष्ट्या खणखर महिला प्रतिनिधी आहेत. त्यांचं नेतृत्व म्हणजे अवघ्या महिलांच्या मुलखाची सामाईक संपत्ती आहे. म्हणूनच हा अनमोल ठेवा प्रत्येक माता भगिणीने आपल्या हृदयाच्या कुपीत जपून ठेवला पाहिजे. कोणतेही प्रश्न मार्गी लावण्यासाठी लागणारी प्रतिभा आणि व्यासंग यांचा सुरेख संगम हया नेतृत्वात झालाय. हया नेतृत्वाचा पिंड सामान्य मातीपासूनच बनलेला आहे.
गुरुवर्य अशोकराव पवार यांच्या सामान्य घरात जन्माला आलेल्या या कन्येनं लहानपणा पासूनच संघर्ष करीत, बदनामी बरोबरच लोकांच्या भिरभिरणाऱ्या नजरा, आणि षड्यंत्राणे नावं ठेवणाऱ्या प्रवृत्तीला लाथाडून, तसेच व्यक्तीगत सुख स्वास्थ्याचा त्याग करत त्यांनी विकासाच्या, परिवर्तनाच्या ज्वळजहाल अग्निकुंडात स्वतःला झोकून दिलेय. त्यातून सांगलीकर भोळ्या- भाबड्या जनतेमध्ये तेजस्विता,स्वावलंबन,स्वाभिमान आणि आत्मसन्मान निर्माण झाला. इथं वर्षानुवर्षे निव्वळ सत्तेसाठी केलं जाणारं राजकारण संपवून इथं विकासाचं राजकारण सुरु करण्याचा मानस आता ह्या धाडसी महिला प्रतिनिधी शर्वरी ताईंनी ठेवलाय.
होरपळून निघालेल्या आणि आयुष्याच्या वाटेवर चालताना पायामध्ये हजारो जखमा होऊनही आपला प्रवास सुखकारक करणाऱ्या, आत्तापर्यंत अस्तित्वासाठी झटणाऱ्या आणि कित्येक घाव सोसून तयार झालेल्या या नेतृत्वाला आता कोणता राजकीय पक्ष संधी देतोय हेच पाहणे उत्सुकतेचं ठरेल. तूर्तास इतकेच….!


