• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

तरुणांना लुटणार्‍या दोघा तोतया पोलिसांना बेड्या

Admin by Admin
May 29, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
तरुणांना लुटणार्‍या दोघा तोतया पोलिसांना बेड्या
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

कोल्हापूर; खबऱ्या प्रतिनिधी : क्रॉईम बॅचचे पोलिस असल्याची बतावणी करून कॉलेज तरुण- तरुणींना अटक करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडील रोख रकमेसह मौल्यवान ऐवज लुटणार्‍या मोरेवाडी नाका (ता.करवीर) परिसरातील दोघा भामट्यांना राजारामपुरी पोलिसांनी शनिवारी बेड्या ठोकल्या. अक्षय सुनील बाटुंगे (वय 27), अंकुश महेश बाटुंगे (25, रा. कंजारभाट वसाहत) अशी त्याची नावे आहेत. शाहू टोलनाका परिसरात सापळा रचून कारवाई करण्यात आली.

संशयितांकडे कसून चौकशी करण्यात येत आहे. शहरासह उपनगरे, ग्रामीण भागात अलीकडच्या काळात घडलेल्या अनेक गुन्ह्यांचा छडा लागण्याची शक्यता असल्याचे पोलिस निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी सांगितले. संशयितांकडून लूटमार झालेल्या कॉलेज तरुण-तरुणींनी तत्काळ राजारामपुरी पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

राजारामपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वैभव हौसिंग सोसायटी परिसरातील मोकळ्या मैदानावर फिरण्यासाठी कॉलेज तरुण-तरुणी येत असतात. शिवाय मार्निंग-इव्हिनिंग वॉकसाठीही गर्दी असते. सायंकाळच्या दरम्यान कॉलेज तरुण-तरुणींना गाठून आम्ही पोलिस आहोत. परिसरात गस्त घालत आहोत. तुम्ही मोकळ्या जागेत काय करता आहात, पोलिस ठाण्यात चला, आई-वडिलांना बोलावून घेऊन त्याच्ंया कानावर या गोष्टी घालू, अशी भीती दाखवून तरुण-तरुणींकडील मोबाईल, रोख रक्कम तसेच मौल्यवान वस्तू हिसकावून घेऊन संशयित पलायन करीत होते.

तरुण-तरुणींनी राजारामपुरी पोलिस ठाण्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजसह अन्य माहीतगारांच्या आधारे संशयितांची माहिती काढली. शनिवारी पहाटे मोरेवाडी येथे जाऊन दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत संशयितांकडून 11 हजार 700 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

Previous Post

बंद साखर कारखाने सुरू करण्यास प्राधान्य : शरद पवार

Next Post

मिरज | महालक्ष्मी एक्सप्रेस धावणार विजेवर, ५ जूनपासून सुरुवात..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मिरज | महालक्ष्मी एक्सप्रेस धावणार विजेवर, ५ जूनपासून सुरुवात..

मिरज | महालक्ष्मी एक्सप्रेस धावणार विजेवर, ५ जूनपासून सुरुवात..

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group