• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरज : लिंगनूरमध्ये दोन गटांत सशस्त्र राडा..

Admin by Admin
May 29, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
मिरज : लिंगनूरमध्ये दोन गटांत सशस्त्र राडा..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मिरज; खबऱ्या प्रतिनिधी : लिंगनूर (ता. मिरज) येथे किरकोळ कारणातून झालेल्या वादावादीतून दोन गटांत तुफान सशस्त्र राडा झाला. कोयता, दगड आणि दांडक्याने झालेल्या मारामारीत दोघे गंभीर जखमी झाले असून, एकजण किरकोळ जखमी झाला आहे. याप्रकणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

मारामारीप्रकरणी अर्जुन अशोक नाईक आणि लोकेश रावसाहेब सुतार यांनी परस्परविरोधी फिर्याद दिली असून सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अर्जुन नाईक याने लोकेश रावसाहेब सुतार, प्रवीण रावसाहेब सुतार, पपलेस नाईक आणि एक अनोळखी अशा चौघांविरुद्ध तर लोकेश सुतार याने अर्जुन अशोक नाईक, राजू परसू नाईक आणि राजू पंडित नाईक यांच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी लोकेश, अर्जुन आणि राजू या तिघांना अटक केली आहे.

लोकेश सुतार याच्या फिर्यादीनुसार, शुक्रवारी सायंकाळी तो गावात शेती औषधे घेण्यासाठी आला होता. त्यावेळी अर्जुन आणि राजू हे दोघे बसस्थानकाजवळ गोंधळ घालत होते. त्यावेळी त्या ठिकाणी थांबलेल्या एका मित्राला लोकेश याने “काय चालले आहे” अशी विचारणा केली. त्यावेळी हा आपल्यालाच काहीतरी म्हणत आहे, अशा समजुतीतून अर्जुन आणि राजू याने लोकेश याला दगडाने मारहाण करून जखमी केले.

अर्जुन नाईक याच्या फिर्यादीनुसार, तो व त्याचा मामेभाऊ राजू नाईक हे दोघे बसस्थानकाजवळ असलेल्या एका चिकन सेंटरजवळ बसले होते. त्यावेळी लोकेश सुतार हा त्या ठिकाणी आला. त्याने “इथे का बसता” असे म्हणून शिवीगाळ, दमदाटी व वादावादी करून निघून गेला. त्यानंतर काही वेळाने दोन मोटारसायकलवरून लोकेश, त्याच भाऊ प्रवीण, पपलेश आणि एक अनोळखी असे चौघे आले. सर्वांनी “आज तुम्हाला सोडत नाही” असे म्हणून दमदाटी केली. त्यानंतर लोकेश आणि प्रवीण या दोघांनी अर्जुन व राजू या दोघांच्या डोक्यात कोयत्याने हल्ला केला. तर पपलेश आणि अन्य अनोळखी व्यक्तीने दांडक्याने दोघांना बेदम मारहाण करून ठार मारण्याचा प्रयत्न केला.

यावेळी भांडण सोडविण्यासाठी काही जणांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी चौघांनी ग्रामस्थांना कोयता दाखवून कोणी मध्यस्थी केली तर त्याला देखील मारहाण करण्याची धमकी देऊन दहशत निर्माण केली. तसेच कोणीही याबाबतीत पोलिसांना माहिती दिल्यास तुमची देखील अशीच अवस्था करण्याची चौघांनी धमकी दिली असल्याचे अर्जुन याने फिर्यादीत म्हटले आहे.

याबाबत मिरज ग्रामीण पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तिघांना अटक केली आहे. चौघांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

देवेंद्र फडणवीस शिवसेनेत येणार..? ‘या ‘ नेत्याच्या वक्तव्याने राजकारणात खळबळ उडवली..!

Next Post

बंद साखर कारखाने सुरू करण्यास प्राधान्य : शरद पवार

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
बंद साखर कारखाने सुरू करण्यास प्राधान्य : शरद पवार

बंद साखर कारखाने सुरू करण्यास प्राधान्य : शरद पवार

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group