• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

देवेंद्र फडणवीस शिवसेनेत येणार..? ‘या ‘ नेत्याच्या वक्तव्याने राजकारणात खळबळ उडवली..!

Admin by Admin
May 28, 2022
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
देवेंद्र फडणवीस शिवसेनेत येणार..? ‘या ‘ नेत्याच्या वक्तव्याने राजकारणात खळबळ उडवली..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कोल्हापूर : गोपनीय खबऱ्या ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल लोकांच्या मनात आस्था आहे. आपल्या घरातील माणूस मुख्यमंत्री झालाय अशी सामान्य जनतेची भावना आहे.

त्यामुळे मुख्यमंत्री यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न चिन्ह निर्माण करणे चूक आहे. राज्यात विरोधक आहेत. पण, त्यांची भूमिका आरोप करणे इतकीच आहे, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.

तळागाळात काम करणाऱ्या शिवसैनिकांची सन्मान व्हावा ही शिवसेनेची भूमिका आहे. त्यामुळेच संजय पवार यांच्यासारख्या शिवसैनिकाला राज्यसभेची उमेदवारी दिली. संभाजीराजे छत्रपती यांना आम्ही शिवसेनेत या असे म्हटले होते.

शिवसेना पुरस्कृत उमेदवार याबाबत विचार करू असं म्हटलं होतं. पण, शिवसेना नेत्यांच्या बैठकीत आम्ही शिवसैनिकाला पाठविण्याचा निर्णय घेतला, असे राऊत यांनी स्पष्ट केले. तसेच, यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत बाजूला बसलेल्या संजय पवार यांचा उल्लेख नवनिर्वाचित खासदार असा केला.

शिवसेनेने पक्षाचा निर्णय घेतला तरी त्यावर विरोध टीका करतात. यामध्ये विरोधकाना काय असुरी आनंद मिळतो हे कळत नाही. चंद्रकांत पाटील हे कोणा कोणाचे वंशज आहेत. 2019 साली कोणी शब्द तोडला हे त्यांनी आधी सांगावे. त्यांनी ‘चोंबडेपणा’ करू नये अशी टीका राऊत यांनी केली.

छत्रपती शिवाजी महाराज हे कोणाच्या मालकीचे नाहीत. ते संपूर्ण विश्वाचे आहेत. शिवसेना पक्षाचा निर्णय हे आमचे नेते आणि पक्षप्रमुख घेणार. आमच्या पक्षाने काय करवाई, कुणाला उमेदवारी द्यावी याचा निर्णय आम्ही घेणार आहोत. त्यावर फडणवीस यांनी बोलू नये. शिवसेनेने काय करावे हे सांगण्यासाठी देवेंद्र फडणवीस शिवसेनेत येणार आहेत का? असा टोला त्यांनी यावेळी लगावला.

Previous Post

सांगलीत “दार उघड बये दार उघड..” ९९ वर्षांच्या आजींना भेटण्यास ‘भाऊजी’ हजर..!

Next Post

मिरज : लिंगनूरमध्ये दोन गटांत सशस्त्र राडा..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मिरज : लिंगनूरमध्ये दोन गटांत सशस्त्र राडा..

मिरज : लिंगनूरमध्ये दोन गटांत सशस्त्र राडा..

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group