• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

नारायण राणे, तुम्ही कधीही कॉल करा,पण सावंतवाडीवरून बोलतोय हे सांगा- उद्धव ठाकरे

Admin by Admin
March 24, 2022
in मंत्रालय, माफ करा स्पष्ट बोलतो, राजकीय
1 min read
0
नारायण राणे, तुम्ही कधीही कॉल करा,पण सावंतवाडीवरून बोलतोय हे सांगा- उद्धव ठाकरे
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

रत्नागिरी : खबऱ्या प्रतिनिधी/ नारायण राणे शिवसेनेतील राजकीय वैर सर्वांना माहित आहे. सध्या दोघांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. पण नारायण राणे यांनी निधीसाठी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची रत्नागिरी येथे भेट घेतली, असं जर तुम्हाला कोणी सांगितल्यास तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही.

शिवाय, ‘तुम्ही मला कधीही फोन करा, मी तुमचा फोन घेईन,’ अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिल्याची माहिती देखील नारायण राणे यांनी दिली.

मुख्य गोष्ट म्हणजे हे सर्व ऐकल्यानंतर तुम्हाला नक्कीच धक्का बसला असेल. पण हे नारायण राणे तुम्हाला अभिप्रेत असलेले अर्थात केंद्रीय मंत्री नारायण राणे नाहीत. तर ते आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली गावचे नागरिक आणि माजी पंचायत समिती सदस्य नारायण राणे. उदय सामंत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि त्यांच्याकडे विकास कामाचा निधी मिळावा यासाठी सावंतवाडीत नारायण राणे यांनी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची रत्नागिरी इथे भेट घेतली. याच वेळी बोलताना उदय सामंत यांनी नारायण राणे भेटीला आल्याची माहिती दिली आणि उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. पण, लगेचच त्यांनी हे नारायण राणे शिवसेनेचे सावंतवाडीतील माजी पंचायत समिती असून आपल्या भेटीसाठी आल्याचा म्हटलं. पण हे जरी काही असलं तरी क्षणभर का असेना सर्वजण विचारतच पडले होते.

काय म्हणाले नारायण राणे?

उदय सामंत यांची भेट घेतल्यानंतर नारायण राणे यांनी प्रसारमाध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली. त्या वेळी बोलताना त्यांनी आपला राष्ट्रवादीतून शिवसेनेने झालेला राजकीय प्रवास सांगितला. मुख्य गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरे यांनी बांधलेले शिवबंधन देखील त्यांनी अभिमानाने दाखवलं. “मला उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी कुणाचीही गरज पडत नाही. मी त्यांना थेट भेटतो. ज्यावेळी आमची भेट झाली तेव्हा तुम्ही मला कधीही फोन करा. मी तुमचा फोन घेणार. फक्त सावंतवाडीहून नारायण राणे बोलतोय, असं सांगा. कारण त्या नारायण राणे यांचा फोन मी घेत नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाल्याचं माजी पंचायत समिती सदस्य नारायण राणे यांनी सांगितलं.

Previous Post

सांगलीत ओबीसी बांधवांचा आरक्षणासाठी एल्गार मेळावा

Next Post

अंगडीया खंडणी प्रकरणात मला वरिष्ठांच्या दबावामुळे गोवण्यात आलं- सौरभ त्रिपाठी

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
अंगडीया खंडणी प्रकरणात मला वरिष्ठांच्या दबावामुळे गोवण्यात आलं- सौरभ त्रिपाठी

अंगडीया खंडणी प्रकरणात मला वरिष्ठांच्या दबावामुळे गोवण्यात आलं- सौरभ त्रिपाठी

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group