• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

जयसिंगपूर | लग्न समारंभातून नवरदेवाचेच पलायन!

Admin by Admin
May 19, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, विशेष
1 min read
0
प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार फरारी..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जयसिंगपूर; खबऱ्या प्रतिनिधी : येथील युवती व सांगवडेवाडीतील मुलगा यांचे गेल्या चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते. असे असताना मुलाने परस्पर दुसर्‍या मुलीबरोबर साखरपुडा करत असताना येथील युवतीने सुरू असलेल्या प्रेमप्रकरणामुळे हा साखरपुड्याचा कार्यक्रम हाणून पाडला.

त्यानंतर नातेवाईकांच्या चर्चेनंतर नृसिंहवाडी येथे दोघांचे लग्न करण्याचा कार्यक्रम ठरला आणि प्रेम करणारी ती युवती व दोघांचे नातेवाईक आले; मात्र लग्नातून नवरदेवाने पलायन केल्याने सर्वांचे धाबे दणाणले.

पहिल्यांदा येथील युवतीशी प्रेमसंबंध ठेऊन जाळ्यात अडकवले आणि लग्नाचे आमिष दाखवून दुसर्‍या मुलीशी साखरपुडा करणार्‍या प्रियकराचा साखरपुडा हाणून पाडल्याने मंगळवारपासून दोन कुटुंबात वाद सुरू होता. अखेर दोन्ही कुटुंबांनी चर्चा करीत प्रेम असलेल्या मुलीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. बुधवारी सर्व तयारी करून दोन्ही कुटुंबे नृसिंहवाडी येथे लग्नासाठी आले असता नवरदेव लग्नात उपस्थित झाला आणि गाडी लावतो असे सांगून त्याने लग्न समारंभातून पलायन केले. आजपर्यंत आपण लग्नातून मुली पलायन केलेल्या घटना ऐकल्या आहेत तर नृसिंहवाडी येथून चक्क नवरदेवाने पलायन केल्याने शिरोळ तालुक्यात चर्चा रंगली होती. दरम्यान, जयसिंगपूर पोलिसांनी त्या पलायन केलेल्या नवरदेवाच्या मुसक्या आवळल्या आहेत.

Previous Post

परस्पर साखर विक्रीचा आरोप ; विटा तहसीलदारांविरोधात तक्रार, स्वाभिमानाचा भक्कम पाठिंबा…

Next Post

सांगली मिरजेपासून काही अंतरावर बिबट्या..?वनखात्याकडून शोध सुरू…

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली मिरजेपासून काही अंतरावर बिबट्या..?वनखात्याकडून शोध सुरू…

सांगली मिरजेपासून काही अंतरावर बिबट्या..?वनखात्याकडून शोध सुरू...

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group