• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

‘गॅस दरवाढ’ विरोधात सांगलीत राष्ट्रवादीचे ‘ चूल पेटवा ‘ आंदोलन, भाजप सरकारचा केला निषेध.

Admin by Admin
March 24, 2022
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
‘गॅस दरवाढ’ विरोधात सांगलीत राष्ट्रवादीचे ‘ चूल पेटवा ‘ आंदोलन, भाजप सरकारचा केला निषेध.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

संजयनगर खबऱ्या प्रतिनिधी : सांगलीतील भीमनगर परिसरात महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने गॅस दरवाढीचा निषेध करण्यात आला. कार्यकर्त्यांसह झोपडपट्टीतील महिलांनी चुलीवर स्वयंपाक करुन मोदी सरकारच्या धोरणांचा निषेध केला.

माजी नगरसेविका विद्याताई कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आज, गुरुवारी सकाळी हे चूल पेटवा आंदोलन करण्यात आले. कांबळे म्हणाल्या की, सर्वसामान्यांना महागाईचा फटका बसत असून घरगुती गॅस सिलेंडर प्रचंड महागला आहे. पेट्रोल आणि डिझेलमध्येही ८० पैशांची वाढ करण्यात आली आहे. महागाई वाढत असल्याने जगायचे कसे, असा प्रश्न सामान्यांना सतावत आहे.

महागाईने आठ महिन्यात उच्चांक गाठला आहे. घरगुती गॅस सिलेंडर हजार रुपयांच्या घरात जाऊन पोहचल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. त्यामुळे मोदी सरकारचा आम्ही निषेध करीत आहोत. सरकारने तातडीने गॅसचे दर कमी करुन सामान्य माणसाला दिलासा द्यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

या आंदोलनात मल्लवा कोठावळे, सुधा चिमलगी, मनिषा कांबळे, वंदना कांबळे, ज्योती इसरडे, रेणुका शिंगे, शशिकला गायकवाड, सखुबाई सूर्यवंशी, माणिक सरवदे, शालन कांबळे आदी उपस्थित होते.

Previous Post

पालकमंत्री सतेज पाटील शिवसेना संपवतील – चंद्रकांत पाटील

Next Post

रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यामुळे महिलांना अश्रू अनावर, ताई नको… ताई नको, राजीनामा नको

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यामुळे महिलांना अश्रू अनावर, ताई नको… ताई नको, राजीनामा नको

रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यामुळे महिलांना अश्रू अनावर, ताई नको... ताई नको, राजीनामा नको

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group