• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

बंडातात्या कराडकर पुन्हा वादात सापडण्याची शक्यता ! महात्मा गांधींचा एकेरी उल्लेख

Admin by Admin
March 24, 2022
in क्राईम, राजकीय, सामाजिक
1 min read
0
बंडातात्या कराडकर पुन्हा वादात सापडण्याची शक्यता ! महात्मा गांधींचा एकेरी उल्लेख
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

पुणे : खबऱ्या प्रतिनिधी/ कीर्तनकार बंडातात्या कराडकर (Bandatatya Karadkar) हे मागच्या काही दिवसात राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP MP) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि भाजप (BJP) नेत्या पंकजा मुंडे (Pankja Munde) यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे चांगलेच वादात सापडले होते. आता पुन्हा एकदा ते वादात सापडण्याची शक्यता आहे.

बंडातात्या कराडकर यांनी महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांचा एकेरी यांचा उल्लेख केल्यामुळे ते वादात सापडण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. खेडमध्ये बोलताना बंडातात्या कराडकर यांनी असे वक्तव्य केले आहे.

बंडातात्या कराडकर म्हणाले,भगतसिंग यांनी केलेली क्रांती अभूतपूर्व आहे. सुरुवातीला त्यांच्या मनामध्ये महात्मा गांधींची छाप होती. महात्मा गांधींच्या अहिंसावादी धोरणाची भगतसिंग यांच्या मनावर छाप होती.

 

आपल्याला हे स्वातंत्र्य अहिंसक मार्गाने मिळवायच आहे, असं भगतसिंग यांना वाटायचे. पण, भगतसिंगाच्या भ्रमाचा भोपळा तीन वर्षांमध्ये फुटला,” असं बंडातात्या यांनी म्हटलंय. “१९२२ ला एक हत्याकांड झालं.

त्या हत्याकांडात समर्थन देण्यासाठी म्हणून महात्मा गांधींनी नकार दिला. तेव्हा, भगतसिंग हे महात्मा गांधींवर नाराज झाले. महात्मा गांधींच्या अहिंसावाद आणि महात्मा गांधी यांचं हिंदुत्व हे दोन्ही पक्षपाती आहेत असे विधान कराडकर यांनी केले आहे.

पुढे बोलताना कराड म्हणाले, भगतसिंग यांच्या मनावर परिणाम झाला की या म्हाताऱ्याच्या (महात्मा गांधी) मार्गाने जाण्याचे कारण नाही. ते त्यानंतर क्रांतिकारक बनले.

लोकमान्य टिळक यांचं एक वाक्य आहे, की म्हाताऱ्याच्या (महात्मा गांधी) पद्धतीने स्वराज्य मिळवायचं असेल ना भारत स्वातंत्र्य व्हायला एक हजार वर्षे लागतील.

१९४७ ला जे स्वातंत्र्य मिळालं ते अहिंसेने मिळालेले नाही. १९४२ ला क्रांतिकारकांची चळवळ उभी राहिली, चले जाव चळवळ! या चळवळीमध्ये गावोगावी पोलीस स्थानके जाळणे, रेल्वे रूळ उखडणे,

सरकारी कचेऱ्या जाळणं या घटना घडत गेल्या. त्याचा बोध इंग्रजांनी घेतला की, आता हा देश सोडण्याशिवाय पर्याय नाही असे वादग्रस्त विधान कराडकर यांनी केले आहे.

Previous Post

कवठेमहांकाळ | सलगरेत ५ लाखांची सुगंधी तंबाखू , पानमसाला जप्त

Next Post

धनंजय मुंडे यांनी स्वतःची सहा मुलं लपवली, अनेक बायकाही लपवल्या, करुणा मुंडेंचे खळबळजनक आरोप

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
धनंजय मुंडे यांनी स्वतःची सहा मुलं लपवली, अनेक बायकाही लपवल्या, करुणा मुंडेंचे खळबळजनक आरोप

धनंजय मुंडे यांनी स्वतःची सहा मुलं लपवली, अनेक बायकाही लपवल्या, करुणा मुंडेंचे खळबळजनक आरोप

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group