• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग | आजी-माजी महापौरांमध्ये शाब्दिक चकमक:किशोरी पेडणेकर थेट दालनात गेल्या, रितू तावडेंनी तात्काळ फोन केला; दोघी फोनवरच भिडल्या.!

Admin by Admin
July 3, 2026
in राजकीय
1 min read
0
ब्रेकिंग | आजी-माजी महापौरांमध्ये शाब्दिक चकमक:किशोरी पेडणेकर थेट दालनात गेल्या, रितू तावडेंनी तात्काळ फोन केला; दोघी फोनवरच भिडल्या.!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

चेंबूरमध्ये स्कूल व्हॅनवर झाड पडून १० वर्षीय विद्यार्थ्याचा झालेला मृत्यू आणि साकीनाका परिसरातील खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये पडून अस्लम शेख यांचा झालेला दुर्दैवी मृत्यू, या दोन धक्कादायक घटनांमुळे मुंबई महानगरपालिकेच्या कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनांनंतर विरोधकांनी पालिकेवर जोरदार टीकास्त्र सोडले असून, उपमहापौर संजय घाडी यांनी या बेजबाबदारपणासाठी थेट पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना जबाबदार धरत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मात्र दुसरीकडे, शिवसेना ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी ट्विटरवर मुख्यमंत्र्यांना टॅग करत आयुक्त अश्विनी भिडे यांचे समर्थन केले असून, या घटनांना जबाबदार असणाऱ्या कनिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील या आरोप-प्रत्यारोपांच्या राजकारणामुळे मुंबई महानगरपालिका सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. याच पार्श्वभूमीवर, पावसाळ्यातील आपत्कालीन परिस्थिती आणि उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष सभेवरून पालिकेत मोठा गदारोळ पाहायला मिळाला. या सभेच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर आणि मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली, ज्यामुळे मुंबईतील पावसाळी संकटाच्या मुद्द्यावरून पालिकेतील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे चित्र आहे.

मुंबई महापालिकेत पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर विशेष सभेचे आयोजन करण्यावरून विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर आणि महापौर रितू तावडे यांच्यात शाब्दिक वाद रंगला आहे. पावसाळी उपाययोजनांच्या चर्चेसाठी स्थायी समिती सदस्य यशोधर फणसे यांच्यासह इतर चार सदस्यांच्या स्वाक्षरीचे पत्र महापौर कार्यालयात वारंवार देऊनही त्यावर कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या किशोरी पेडणेकर यांनी थेट महापौर कार्यालयात जाऊन तेथील कर्मचाऱ्यांना जाब विचारला आणि अधिकाऱ्यांना त्यांच्या जबाबदाऱ्यांची आठवण करून देत चांगलेच सुनावले. यावेळी महापौर त्यांच्या दालनात उपस्थित नसल्यामुळे या दोघींची प्रत्यक्ष भेट होऊ शकली नाही.

पेडणेकर आणि तावडे यांच्यात शाब्दिक चकमक

या घटनेची माहिती मिळताच महापौर रितू तावडे यांनी किशोरी पेडणेकर यांना फोन करून आपली तीव्र नाराजी व्यक्त केली. “माझ्या कार्यालयात येऊन अशा प्रकारे वागणे योग्य नाही,” अशी भूमिका महापौरांनी मांडली. यावर थेट उत्तर देताना पेडणेकर यांनी स्पष्ट केले की, “मी तुमच्या दालनात गेले नव्हते, तर बाहेरील कर्मचारी कार्यालयात गेले होते जे सर्वांसाठी खुले असते. तेथील कर्मचारी काम करत नसल्याने मी केवळ त्यांना जाब विचारला.” या मुद्द्यावरून दोन्ही नेत्यांमध्ये फोनवरच जोरदार शाब्दिक चकमक उडाली आणि हा वाद चव्हाट्यावर आला.

विशेष सभा बोलावण्याची मागणी

दरम्यान, प्रशासनावरील दबाव वाढवत स्थायी समिती सदस्य यशवंत किल्लेदार यांनीही महापालिका सचिवांना एक पत्र लिहून तातडीने विशेष सभा बोलावण्याची अधिकृत मागणी केली आहे. या पत्रावर टी. प्रभू, रमाकांत रहाटे, श्रद्धा जाधव आणि अशरफ आझमी या स्थायी समिती सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या पत्रात अलीकडेच चेंबूर आणि साकीनाका येथे घडलेल्या दुर्दैवी घटनांचा विशेष उल्लेख करण्यात आला असून, पावसाळ्याच्या निमित्ताने महापालिकेने गांभीर्याने उपाययोजना कराव्यात याकडे लक्ष वेधण्यात आले आहे.

रितू तावडे काय म्हणाल्या?

या संपूर्ण प्रकरणावर महापौर रितू तावडे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, महत्त्वाचे काही काम असतील त्याचे सगळे पत्र त्या ठिकाणी तयार होतात. बऱ्याच महत्त्वाचे मीटिंग असतात, इतर कर्मचारी वर्ग काम करत असतात. मी हेड ऑफिसला नसताना त्या माझ्या दालनात आल्या. इथे आल्यानंतर त्यांनी 5-6 लोकांना घेऊन आल्या होत्या आणि त्यातल्या एकाने मोबाइलमधून दालनाचे चित्रीकरण केले. जे माझे पीएस आहेत त्यांना दादागिरी करून माझ्या पत्रांचे काय झाले, असा जाब विचारला. माझी कागदपत्र माझ्या परवानगीशिवाय घेतले. हे कायद्यानुसार चूक आहे.

पुढे बोलताना रितू तावडे म्हणाल्या, मुंबईचे तसेच मुंबईकरांचे महत्त्वाचे कागदपत्र या ठिकाणी असतात. त्या आल्या त्याचे काही नाही, पण त्यांनी चित्रीकरण केले. अशा पद्धतीची वागणूक विरोधी पक्षनेत्याला शोभत नाही. माझी कागदपत्र जी गोपनीय कागदपत्र असतात त्या मागवून घेतले होते आणि फोटो देखील काढले. हे मोठे ओफेन्स आहे आणि मी माझे पत्र पोलिसांना देत आहे. त्यांचे वागणे समाजशास्त्राला अनुसरून नाही आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मी करणार आहे. मुंबईकरांचे प्रश्न सोडवायचे असतील तर बाहेर पडले पाहिजे. घरात बसून काही नाही होत. त्यांना कॉल पण करता आला असता पण त्या थेट माझ्या दालनात शिरल्या, असे रितू तावडे यांनी म्हटले आहे. विरोधी पक्ष नेत्या निघून जातात.

ADVT – सांगली पोलिसांकडून अधिकृत प्रसारित
Previous Post

सांगली | ‘एचएसआरपी’ नसल्यास दंड एक हजार, पावती मात्र दोन हजाराची; ई-चलानामुळे आरटीओ अधिकारीही संभ्रमात

Next Post

मिरज ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; अवैध वाळू व मुरूम वाहतूक करणारे दोन डंपर जप्त

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मिरज ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; अवैध वाळू व मुरूम वाहतूक करणारे दोन डंपर जप्त

मिरज ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; अवैध वाळू व मुरूम वाहतूक करणारे दोन डंपर जप्त

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group