कुपवाड प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका पंचवार्षिक निवडणूकीसाठी कुपवाडच्या प्रभाग क्रमांक २ मध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी प्रचाराचा धुमधडाका लावत विरोधकांसमोर तगडे आव्हान उभे केले आहे.
प्रभाग क्रमांक २ मध्ये भाजपच्या सौ. प्राजक्ता धोतरे, सौ. मालुश्री खोत व प्रकाश ढंग, प्रकाश पाटील या अधिकृत उमेदवारांनी घरोघरी सुरू केलेल्या भेटीसाठी मोहिमेला नागरिकांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. या चारही उमेदवारांनी मतदारसंघातील प्रत्येकाच्या घरोघरी भेटी देऊन निवडून येण्यासाठी मतदारांचा आशीर्वाद मतदान करण्याचे आवाहन केले.

भाजपाने प्रचंड जनसंपर्क असलेल्या या चारही उमेदवारांना महापालिका निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे. प्रचाराच्या पहिल्या टप्प्यापासूनच या उमेदवारांनी प्रभागातील कानाकोपऱ्यात जाऊन मतदारांशी थेट संवाद साधण्यावर भर दिला आहे. घराघरात भाजप, मनामनात भाजप या ध्येयाने उमेदवार आणि कार्यकर्त्यांची फौज मैदानात उतरवली आहे. गेल्या काही दिवसात झालेल्या कोपरा सभा आणि पदयात्रेदरम्यान महिला, तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांचा मोठा सहभाग दिसून आला.
आमच्या समस्या ऐकून सोडवण्यासाठी क्षमता असणारे नेतृत्व आम्हाला हवे, अशा भावना अनेक मतदारांनी व्यक्त केल्या. यामुळे भाजपच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे. भाजपाचे ही आक्रमक रणनीती व तळागाळातील कार्यकर्त्यांचे मजबूत जाळे यामुळे विरोध पक्षांच्या उमेदवारांना आपली रणनीती बदलण्यास भाग पाडले आहे. कुपवाडच्या प्रभाग २ चा विकासाच्या माध्यमातून चेहरा मोहरा बदलण्याचा भाजपचा अजेंडा असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या प्रभागात मतदारांच्या उदंड प्रतिसादामुळे चारही गटात कमळ फुलणार असा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये आहे.

