खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका निवडणुकीचा काळ हा अत्यंत दिवसेंदिवस संवेदनशील बनत चालला असतानाच सांगली शहरातील शामरावनगर, संजयनगर हे हॉटस्पॉट ठिकाणं आहेत. तर कुपवाड परिसरातही नेहमीच धगधग असते. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था ऐरणीवर येणार नाही याची दखल जिल्हा पोलीस प्रशासनाकडून घेण्यात आली आहे. मिरज शहरात सध्या शांततापूर्ण वातावरण असल्याने पोलिस यंत्रणा सज्ज असल्याचे दिसत आहे.
शुक्रवारी रात्री सांगली शहरातील शंभरफुटी जवळ चेतन नामक युवकाचा खून झाल्याची घटना समोर आली आहे. या वृत्ताने परिसरात जोरदार खळबळ उडाली असून नागरिक अक्षरशः हादरून गेले आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, खून झालेला चेतन हा रामनगरचा रहिवासी असून महादेव कॉलनी येथील मामा व भाच्याने चेतनला खुन्नस देवून ठार मारल्याची चर्चा सुरू आहे. पोलिस घटनास्थळी पोहोचले असून पुढील कार्यवाही सुरू आहे.
नवीन वर्षातील हा दुसरा खून असून, या खुनाच्या घटनेने सांगली हादरल्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात पोलिस यंत्रणा कमी पडत असल्याचे जाणकार व ज्येष्ठ नागरिक बोलून दाखवत आहेत. वारंवार तेच गुन्हेगार एकावर एक असे दहशत माजवत गुन्हे करतात, आणि पोलिस त्याला तुडवू शकत नाहीत ही लाजिरवाणी बाब असल्याचे मत महिला समुदायातून व्यक्त होत आहे.

