• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

प्रभाग क्रमांक ३,५ व ७ मध्ये भाजपा आमदार डॉ. सुरेश (भाऊ) खाडे यांचा जनसंवाद

Admin by Admin
January 9, 2026
in राजकीय
1 min read
0
प्रभाग क्रमांक ३,५ व ७ मध्ये भाजपा आमदार डॉ. सुरेश (भाऊ) खाडे यांचा जनसंवाद
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या 

शहरात सुरू असलेल्या महानगरपालिका निवडणूक प्रचाराच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या वतीने दि.  ०८ जानेवारी २०२६ रोजी शहरातील प्रभाग क्रमांक ३, ५ व ७ येथे विविध ठिकाणी प्रचार बैठका व नागरिक संवाद कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांना भाजपाचे आमदार डॉ. सुरेश (भाऊ) खाडे यांनी उपस्थित राहून कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिकांशी थेट संवाद साधला.

या वेळी आमदार डॉ. सुरेश (भाऊ) खाडे यांनी शहराच्या व प्रभागातील सद्यस्थितीचा आढावा घेताना पाणीपुरवठा, रस्त्यांची खराब अवस्था, ड्रेनेज व सांडपाणी व्यवस्था, कचरा व्यवस्थापन, स्वच्छता, आरोग्य सुविधा तसेच इतर मूलभूत नागरी समस्यांवर सविस्तर मार्गदर्शन केले. गेल्या काही वर्षांत केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून शहरासाठी राबविण्यात आलेल्या विविध विकास कामांचा त्यांनी आढावा घेतला.

भाजपा सरकारच्या विविध लोकाभिमुख योजनांमुळे सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, त्या योजना अधिक प्रभावीपणे तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी महानगरपालिकेत सक्षम, प्रामाणिक व विकासाभिमुख प्रतिनिधी असणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपाचे नगरसेवक निवडून आल्यास प्रभागातील रखडलेली कामे मार्गी लावून नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले.

या बैठकीदरम्यान प्रभाग क्रमांक ३, ५ व ७ मधील नागरिकांनी आपल्या विविध समस्या, तक्रारी व सूचना आमदार खाडे यांच्यासमोर मांडल्या. नागरिकांच्या प्रश्नांकडे सकारात्मक दृष्टीने पाहून टप्प्याटप्प्याने त्यांचे निराकरण केले जाईल, तसेच सर्व प्रभागांचा समतोल विकास साधला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

या प्रचार बैठकीस भाजपाचे स्थानिक पदाधिकारी, बूथ प्रमुख, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने महिला, ज्येष्ठ नागरिक व युवक उपस्थित होते. या बैठकींमुळे संबंधित प्रभागांमध्ये भाजपाच्या प्रचाराला अधिक बळ मिळाले आहे.

Previous Post

भाजपची अवस्था पिंजरा चित्रपटातील मास्तरासारखी, तमाशाचा एवढा नाद लागलाय की तुणतुणे… ; जयंत पाटलांची जहरी टीका

Next Post

प्रभाग क्रमांक ७ मध्ये पप्पू कोळेकरांना मत म्हणजे विकासाला मत, भाजपच्या दबावाला बळी पडू नका – महादेव जानकर

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
प्रभाग क्रमांक ७ मध्ये पप्पू कोळेकरांना मत म्हणजे विकासाला मत, भाजपच्या दबावाला बळी पडू नका – महादेव जानकर

प्रभाग क्रमांक ७ मध्ये पप्पू कोळेकरांना मत म्हणजे विकासाला मत, भाजपच्या दबावाला बळी पडू नका - महादेव जानकर

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group