खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या प्रभाग क्रमांक ३ येथील अधिकृत उमेदवारांनी उत्साहात निवडणूक प्रचाराला सुरुवात केली आहे. प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपला विजयी करण्याचे आवाहन उमेदवारांनी मतदारांना केले.
प्रभाग क्रमांक ३ मधील भाजपचे अधिकृत उमेदवार संदीप सुरेश आवटी, छाया सचिन जाधव, शशिकला अजित दोरकर आणि सुनीता सोपान व्हनमाने यांनी प्रभागातील विविध भागांना भेटी देत नागरिकांशी थेट संवाद साधला. या संवादादरम्यान नागरिकांनी नागरी सुविधा तसेच सुरक्षेच्या समस्या मांडल्या.
उमेदवारांनी भाजपच्या माध्यमातून विकासाभिमुख, पारदर्शक आणि लोकाभिमुख कारभार करण्याचे आश्वासन दिले. प्रभाग क्रमांक ३ चा सर्वांगीण विकास करणे, मूलभूत सुविधांचा दर्जा उंचावणे आणि नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडवणे हेच आमचे मुख्य उद्दिष्ट आहे, असे उमेदवारांनी सांगितले.
तसेच आगामी निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांना भरघोस पाठिंबा देण्याचे आवाहनही त्यांनी केले. या प्रचार दौऱ्यादरम्यान भाजपचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

