खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
कवलापुर (ता. मिरज) येथील माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध सहकारी संस्थांचे चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक तसेच विविध मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी माजी पालकमंत्री आ. डॉ. सुरेशभाऊ खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. कवलापुर येथील भानुदास किसनराव पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. कवलापुर येथे आयोजित कार्यक्रमात आ. डॉ. सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते सर्व प्रवेशकर्त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
या पक्षप्रवेशात ग्रामपंचायत कवलापुरच्या विद्यमान व माजी लोकप्रतिनिधींसह मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांचा सहभाग आहे. भाजपच्या विचारधारेवर विश्वास ठेवून व विकासाभिमुख राजकारणाला बळ देण्यासाठी हा प्रवेश करण्यात आल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
भाजपमध्ये प्रवेश केलेल्या मान्यवरांमध्ये सुषमा शरद पाटील (सरपंच), भानुदास किसनराव पाटील (अध्यक्ष – तंटामुक्ती समिती), प्रमोद सुरेशराव पाटील, कुमार आण्णासो माळी, सतिश दिनकर खाडे (माजी उपसरपंच), शुभांगी मोहन नलावडे, उज्वला कैलास गुंडे, विद्याताई अजय माळी, चंदाताई दिगंबर ढवणे, रेखाताई अशोक पाटील, शारदा विवेक खाडे, वंदना अशोक पाटील, प्रकाश रामचंद्र हाक्के, विजय आप्पासो पाटील, अशोक धोंडीराम कांबळे, सुनिता लक्ष्मण माळी, सुनिता महादेव मुळे, शिवाजी भाऊ माने (माजी सरपंच) यांच्यासह अनेक माजी प्रभारी सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा समावेश आहे.

तसेच वंदना कैलास मोहिते, सारिका अमोल भोरे (सदस्या), बबन निवृत्ती गावडे, बादल मारुती कांबळे, महादेव भुपाल कांबळे, भारती उत्तम भोरे, अनुराधा प्रकाश पाटील (माजी उपसरपंच), सुनिल श्रीपती पाटील, शिवाजी आप्पासो नलावडे (माजी प्रभारी सरपंच), आनंदा विष्णु पाटील, जयपाल ज्ञानु खाडे, शामराव शंकर खाडे, जयश्री अरुण कांबळे (माजी सदस्य) यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.
या सामूहिक पक्षप्रवेशामुळे कवलापुर व परिसरात भारतीय जनता पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत झाली असून, आगामी काळात भाजप अधिक जोमाने जनतेच्या प्रश्नांसाठी कार्य करेल, असा विश्वास यावेळी आ. डॉ. सुरेश खाडे यांनी व्यक्त केला.

