खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
प्रभाग क्रमांक २० मधून ठाकरेंच्या शिवसेनेतून निवडणुकीच्या रिंगणात उभे असलेल्या उमेदवार आता एकटे पडल्याने जनतेसमोर मात्र प्रश्न निर्माण होत आहे. सोबत शिवसेनेचे शहरातील कोणतेच नेते व कार्यकर्ते नसल्याने उमेदवार आता हतबल झाले आहेत.
जनसंपर्काचा अभाव दिसून येत असल्याने प्रभागातील काही ठराविक भागातच मतांचे वर्गीकरण करण्यासाठी व निवडून येण्याची शक्यता ज्या उमेदवाराची जास्त आहे, अशा उमेदवाराला खोडा घालण्यासाठी विरोधकांकडून विडा उचलल्याची चर्चा आता प्रभागात जोरदार रंगू लागली आहे.
मतदारांकडून उमेदवाराची पार्श्वभूमी, त्याच्या कामाचा दर्जा आणि जनतेच्या समस्यांबाबत केलेला पाठपुरावा याचं सूक्ष्म निरीक्षण केले जात आहे. प्रभागामध्ये सुरू असलेले अवैध धंदे याबाबतीत आवाज उठवला आहे का..? प्रभागात स्ट्रीटलाइट्स, रस्ते व पाणी यासंदर्भात याअगोदर कधी निवडणुकीसाठी रिंगणात असलेल्या उमेदवारांनी लक्ष दिलय का..? केवळ स्वतःच्या आर्थिक बाजू मजबूत करण्यासाठी व स्वार्थी राजकारणासाठी निवडणूक लढवणाऱ्यांची टक्केवारी आता वाढली आहे.
मतदार बंधू-भगिनींमध्ये मात्र याबाबतीत शंका निर्माण होत असून मतदार याकडे हास्यास्पद बाब म्हणून केवळ मनोरंजन म्हणून गंमत पहात बसले आहेत. यांना गांभीर्याने घेणार कोण?
निवडणुकीच्या रिंगणात उतरायचा आहे तर सर्व बाजूंनी सक्षम असणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रभागातील जातनिहाय मतदार संख्या किती..? प्रभागाची लोकसंख्या किती..? उमेदवार किती अभ्यासू आहे. त्याला प्रशासकीय व सामाजिक कार्याचा अनुभव आहे का..? त्याची बौद्धिक क्षमता व गुणवत्ता तपासण्याचे काम हे नागरिकांनी आता क्रमप्राप्त मानले आहे.
या साऱ्या बाबींचा विचार करता प्रभाग क्रमांक २० मधील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेचा प्रचार व प्रसार संथ गतीने सुरू असून नागरिकांचा अल्प प्रतिसाद मिळत आहे.

