• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

पोलिसांचा कडक इशारा.! सराईत गुन्हेगारांची धिंड, मालमत्तेवर बुलडोझर, धडक कारवाईने नागरिकांतून समाधान व्यक्त..!

Admin by Admin
November 12, 2025
in क्राईम
1 min read
0
पोलिसांचा कडक इशारा.! सराईत गुन्हेगारांची धिंड, मालमत्तेवर बुलडोझर, धडक कारवाईने नागरिकांतून समाधान व्यक्त..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या 

कोयते नाचवत दहशत माजविणारे, गाड्यांची तोडफोड, गाड्या पेटवून देणे, बेभान दुचाकी चालविणार्‍या गुन्हेगारांच्‍या काळेपडळ पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून कुख्यात गुंडांच्या मालमत्तेवर बुलडोझर चालवला आहे.

नवख्या गुन्हेगारांवर वेळीच जरब बसवली आहे. काळेपडळ पोलिस ठाणे हे काही महिन्यांपूर्वी सुरू झाले असून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी विविध उपाययोजना या पोलिस ठाण्याकडून वरिष्ठ पोलिस निरीक्षक मानसिंग पाटील हे राबवत आहेत. मंगळवारी सायंकाळी श्रीराम चौकात गुन्हेगारांची धिंड काढली व सर्वसामान्य नागरिकांसोबत आम्ही आहोत, हे पोलिसांनी जनतेला दाखवून दिले.

काळेपडळ पोलिस ठाण्याच्‍या हद्दीत वरिष्ठांच्या आदेशानुसार विधिसंघर्षित बालकांना पोलिस स्टेशनमध्ये समक्ष बोलावून योग्य सूचना देण्यात आल्या. त्यांच्‍या सविस्‍तर माहितीचे अर्ज (डोझियर) भरण्यात आले.

तसेच, त्यांचे नातेवाईक, पालकांना देखील सदरबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विधिसंघर्षित बालकांकडून झालेले गुन्हे पुन्हा घडणार नाहीत, याबाबत पालकांनी ग्वाही दिली. विधिसंघर्षित बालकांवर योग्य ती प्रतिबंधक कार्यवाही करण्याची तजवीज सुरू आहे.

तसेच, सदर विधिसंघर्षित बालकांना समुपदेशनद्वारे मन परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला आहे. विधिसंघर्षित बालकांचे नातेवाईक व पालक यांना योग्य ते मार्गदर्शन करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी सांगितले.

Previous Post

सांगलीतील खळबळजनक डबल मर्डर प्रकरणात मोठा ट्विस्ट! हल्लेखोर शाहरूखची हत्या नव्हे तर मृत्यू, सीसीटीव्हीमुळे उलगडलं रहस्य

Next Post

जतमध्ये आघाडीची घोषणा ; सुरेशराव शिंदे हेच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
जतमध्ये आघाडीची घोषणा ; सुरेशराव शिंदे हेच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार..!

जतमध्ये आघाडीची घोषणा ; सुरेशराव शिंदे हेच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group