• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगलीत डबल मर्डर.? दलित महासंघाच्या उत्तम मोहितेचा खून ! हल्लेखोर शेखला मारहाण,उपचारादरम्यान मृत्यू.?

Admin by Admin
November 11, 2025
in क्राईम
1 min read
0
सांगलीत डबल मर्डर.? दलित महासंघाच्या उत्तम मोहितेचा खून ! हल्लेखोर शेखला मारहाण,उपचारादरम्यान मृत्यू.?
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

सांगली शहरातील दलित महासंघ या संघटनेचा राज्य अध्यक्ष उत्तम मोहिते (वय ४१, रा. गारपीर चौक, सांगली) याचा धारदार शस्त्राने सपासप वार करत निर्घृणपणे खून करण्यात आला. मंगळवारी उत्तम मोहिते याचा वाढदिवस होता. तो साजरा करत असताना झालेल्या वादातून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. रात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. यामुळे जिल्ह्यात सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान उत्तम मोहिते याच्यावर हल्ला करणाऱ्याचा उपचार सुरु असताना मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. रात्री उशिरापर्यंत याबाबत शहर पोलिसांत नोंद करण्याचे काम सुरु होते. दरम्यान गारपीर चौक परिसरात मोठया प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

शाहरुख उर्फ शेऱ्या शेख (वय ३०, रा. इंदिरानगर, सांगली) असे संशयिताचे नाव आहे. उत्तम मोहिते याचा मंगळवारी वाढदिवस होता. रात्री मोहिते याच्या गारपीर चौक येथील घराजवळ त्याचे मित्र तसेच समर्थक वाढदिवस साजरा करत होते. त्यावेळी संशयित शेख तेथे गेला होता. त्यावेळी मोहिते आणि त्याच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला.

त्यानंतर शाहरुखने गुप्ती सारख्या धारदार शस्त्राने मोहिते याच्यावर सपासप वार केले. मोहिते याने डाव्या हाताने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच्या पोटावर आणि छातीवर वर्मी घाव बसला. वार एवढे जोरदार होते की त्यामध्ये त्याची आतडी बाहेर आली होती तर डावा हात कोपरातून तुटला होता.

हल्ला झाल्यावर उत्तम मोहिते जागेवरच कोसळला. ते पाहून त्याच्या वाढदिवसासाठी जमलेल्यानी शेखला पकडून बेदम मारहाण केली. त्यात तो गंभीर जखमी झाल्याने त्याला सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. तेथे अति दक्षता विभागात उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाल्याचे समजते. मात्र उशिरापर्यंत पोलिसांनी शेख याचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला होता.

उत्तम मोहिते याचा खून झाल्याची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक संदीप घुगे, एलसीबीचे वरिष्ठ निरीक्षक सतिश शिंदे, सांगली शहरचे पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर, विश्रामबागचे निरीक्षक सुधीर भालेराव यांनी पथकासह सिव्हिल हॉस्पिटलकडे धाव घेतली. मोहिते याचा मृत्यू झाल्याचे समजल्यावर त्याचे नातेवाईक, मित्र, समर्थक यांनी सिव्हिल परिसरात गर्दी केली होती. नातेवाईकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. रात्री उशिरापर्यंत शहर पोलिसांत या घटनेची नोंद करण्याचे काम सुरु होते.

Previous Post

सांगली |™१२ दिवस पोलिसांना चकवा देत फिरले, बालकाचे अपहरण करणाऱ्या जोडप्याला अटक!

Next Post

ब्रेकिंग | मंचर जवळ भाविकांच्या बसला अपघात; नागपूर येथील २२ भाविक जखमी!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
ब्रेकिंग | मंचर जवळ भाविकांच्या बसला अपघात; नागपूर येथील २२ भाविक जखमी!

ब्रेकिंग | मंचर जवळ भाविकांच्या बसला अपघात; नागपूर येथील २२ भाविक जखमी!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group