खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार डॉ.सुरेश खाडे यांनी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर शहरात विकासकामांचा शुभारंभ सुरु केला असून रविवारी मिरजेतील प्रभाग क्रमांक तीनमध्ये अण्णाभाऊ साठे योजना, नगरोत्थान योजना आणि आमदार फंड या अंतर्गत तब्बल १ कोटी ४५ लाख रुपयांच्या एकूण ९ विकासकामांचा शुभारंभ आ. डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते संपन्न झाला. याच प्रभागातील अन्य आठ कामांसाठीच १ कोटी १५ लाख रुपयांचा प्रस्ताव पाठविण्यात आला असून लवकरच त्या कामांची मंजुरी येणार असून ती कामेही तातडीने सुरु होणार आहेत. प्रभागातील नागरिकांच्या मागणीप्रमाणे व या नागरिकांना सदरची कामे करून देण्याचे आश्वासन दिल्याप्रमाणे आ.खाडे यांनी आश्वासनाची पूर्तता केली असून जनतेला या विकासकामांच्या माध्यमातून दिवाळी भेट दिली आहे.
रविवारी प्रभाग तीन मध्ये संपन्न झालेल्या विकासकामांच्या शुभारंभामध्ये शिंदे बोळ काँक्रीट रस्ता करणे (१० लाख), रानभरे बोळ कॉन्क्रीट करणे (१० लाख) , तानाजी साळुंखे घर ते तानाजी चौक रस्ता डांबरीकरण व रस्ता सुधारणा करणे (४० लाख), आदर्श कॉलनी मधील रस्ता सुधारणा करणे (१० लाख), कल्पतरू कॉलनी जवळील देशमाने घर ते मेघाणी घर रस्ता सुधारणा करणे (१० लाख), गोसावी गल्ली जिजामाता चौक येथील सभामंडप विकसित करणे (१० लाख), पंढरपूर रोड माने घर ते वारकरी भवन रस्ता सुधारणा करणे (१५ लाख), साईनंदन पार्क जवळील म्हाडा कॉलनी मधील रस्ते काँक्रीट करणे (१५ लाख) आणि रमा उद्यान येथे गणपती मंदिर सभामंडप बांधणे (२५ लाख) या विकासकामांचा समावेश आहे.
या सर्व कामांचा शुभारंभ आ.सुरेश खाडे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी युवा नेते सुशांत खाडे, भाजप पूर्व मंडळ अध्यक्ष चैतन्य भोकरे, भाजप पश्चिम मंडळ अध्यक्षा सौ. अनिता हारगे, माजी स्थायी समिती सभापती सुरेश आवटी, माजी नगरसेवक पांडुरंग कोरे, गणेश माळी, दिगंबर जाधव, निरंजन आवटी, संदीप आवटी, अजित दोरकर, शशिकांत वाघमोडे, बाबासाहेब आळतेकर, सचिन जाधव, माजी महापौर संगीता खोत, उद्योजक विनायक यादव, अजिंक्य हंबर, विलास मोरे यांच्यासह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.