सांगली : खबऱ्या प्रतिनिधी ; सांगली मंडळ अधिकारी व मिरज प्रान्त यांच्या कारभारा बाबत सांगली जिल्हाधिकारी यांचे दालनात झालेल्या बैठकीत विधानपरिषदेचे उपसभापती मा डॉ नीलमताई गोऱ्हे यांना पुराव्यांनीशी शिवसेना गुंठेवारी विकास समितीचे प्रदेशाध्यक्ष चंदनदादा चव्हाण यांनी लेखी तक्रार देऊन पोच घेतली आहे.शिवाय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा उद्धवजी ठाकरे साहेब यांना हि महाराष्ट्र शासनाच्या पोर्टल वर तक्रार दाखल करण्यात आली – चंदनदादा चव्हाण .
सांगली मंडळ अधिकारी यांनी अकृषक पावत्या तलाठी कार्यालयात काढून थेट तहसीलदार यांचा अकृषक आदेश नसताना नोंदी निर्गत करून गुंठेवारी जनतेची मोठी फसवणूक केली आहे त्याचे पुरावे सादर केले आहेत व त्यांनी अनेक सांगली चावडीत झिरो कर्मचारी नेमून नागरिकांची कशी लूट करतात त्यांचे पुरावे फोटो सह जोडले आहेत.
मिरज प्रांत यांनी मिरज राष्ट्रीय महामार्ग चे मक्तेदार यांना गौण खनिज बाबत मोठी सूट का दिली आहे?अनेक बळीराजाच्या जमिनी महामार्गात गेल्या आहेत त्यांना कशा पद्ध तिने पैसे वाटप केले आहेत. त्या बाबत सक्षम अधिकारी राज्य शासना मार्फत अधिकारी नेमून संपूर्ण कामाची चौकशी करावी. शिवाय कवठेमहांकाळ येथील वर्ग 3 ची देवस्थान इनाम असताना त्यामध्ये वर्ग दोन करून त्यामध्ये कुळाना 50 टक्के पैशाचे वाटप तेही न्याय प्रविष्ठ बाब असताना केले आहे.अशी किती प्रकरणे झाली आहेत.शिवाय त्यांच्या कार्यक्षेत्रातील अनेक तलाठी त्यांच्यावर गुन्हे नोंद असताना त्यांना यांनी पाठीशी घालून त्यांना तलाठी कार्यालये देण्यात या प्रान्त महाशयांनी ऑर्डर केल्या आहेत अनेक जणांना सक्तीच्या रजेवर जिल्हाधीकारी यांनी पाठवले असताना त्यांना परत टिपण्या करायला लावून यांचा अशा भ्रष्ट तलाठ्याना पाठीशी घालण्याचा उद्योग केला आहे या गंभीर प्रकारनाची चौकशी करून यांना घरचा रस्ता दाखवावा अशी मागणी करण्यात आली आहे.
शिवाय या बाबत मिरज प्रान्त यांच्या मालमत्तेची संपूर्ण चौकशी व्हावी यासाठी आयकर खात्याकडे समिती लवकरच तक्रार देणार आहे. हे अधिकारी लोकांहिताच्या ऐवजी स्वहिताच्या भानगडीत अडकून सर्व सामान्य जनतेला वेठीस धरले आहे. त्याकडे अपील करणाऱ्याना या महाषयांनी उद्धट वर्तन करून सामनेवाल्याची बाजू धरलेली आहे. उद्धट बोलायची काय आवश्यकता आहे. हे अधिकारी किती लाचार झाले आहेत यावर आम्ही प्रकाशझोत टाकला आहे
शिवाय जून च्या पहिल्या आठवड्यात विराट मोर्चाने मिरज प्रान्त व सांगली मंडळ अधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी जन आंदोलन करण्यात येणार आहे

