जत प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
अतिवृष्टीमुळे झालेल्या मोठ्या नुकसानीचा सामना करत असलेल्या मायबाप शेतकऱ्यांच्या न्यायासाठी जत तालुका काँग्रेस कमिटीकडून एकदिवसीय लाक्षणिक उपोषण आंदोलन करण्यात येणार आहे. हे आंदोलन मंगळवार, दिनांक ७ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता तहसील कार्यालयाच्या प्रांगणात होणार असून या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी, काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.
अतिवृष्टीच्या तडाख्यामुळे जत तालुक्यातील अनेक भागातील शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांची आर्थिक घडी विस्कटली असून त्यांच्या हक्काचा आवाज शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी हे आंदोलन हाती घेण्यात आले आहे.अतिवृष्टी झालेल्या संपूर्ण भागात सरसकट पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी. शेतकरी बांधवांची सर्व कर्जे तात्काळ माफ करण्यात यावीत.ओला दुष्काळ जाहीर करावा.नुकसान भरपाईचे दर प्रति हेक्टर वाढवून देण्यात यावेत. शेतकऱ्यांचे थकीत वसुली बँक कर्ज मुदतवाढ, तसेच शिक्षण शुल्क व महसूल थकबाकी माफ करण्यात यावी.
या आंदोलनाचे नेतृत्व जत तालुका काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी करतील. याप्रसंगी जिल्हा, तालुका तसेच स्थानिक काँग्रेस नेत्यांची उपस्थिती राहणार आहे. शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आणि त्यांच्या मागण्यांसाठी लढा देण्याचा निर्धार या आंदोलनाद्वारे व्यक्त करण्यात येणार आहे.
ठिकाण: प्रशासकीय इमारत, तहसील कार्यालय आवार, जत
दिनांक: मंगळवार, ७ ऑक्टोबर २०२५
वेळ: सकाळी १०:०० वाजता
लाक्षणिक उपोषणाद्वारे शेतकऱ्यांच्या वेदना शासनापर्यंत पोहोचवून त्यांना तातडीने मदत मिळावी, हा जत तालुका काँग्रेस कमिटीचा हेतू आहे. शेतकऱ्यांच्या न्यायासाठी एकत्र येऊन आवाज उठविण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.