• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र, म्हणाले… सुरू झालं आता राजकारणाचं सत्र..?

Admin by Admin
May 10, 2022
in मंत्रालय, राजकीय
1 min read
0
राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र, म्हणाले… सुरू झालं आता राजकारणाचं सत्र..?
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे भोंग्यांच्या मुद्द्यावर ठाम आहेत. आता त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच जाहीरपणे खरमरीत भाषेत पत्र लिहिले आहे.

त्यांनी म्हटलं आहे, राज्य सरकारला माझं एकच सांगणं आहे; आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. सत्ता येत- जात असते. कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही. उद्धव ठाकरे, तुम्हीही नाही!

 

 

राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र जशाच तसं :

सस्नेह जय महाराष्ट्र! सर्व देशबांधवांना मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी मी पत्राद्वारे आवाहन केल्यानंतर महाराष्ट्र राज्य सरकार बेभान होऊन अंगात आल्यासारखं वागत आहे. देशाचे सर्वोच्च न्यायालय आणि विविध राज्यातील उच्च न्यायालयं यांनी दिलेल्या निर्णयांची अंमलबजावणी व्हावी यासाठी माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी ४ मे रोजी ‘भोंगे उतरवा’ आंदोलन सुरू करण्यापूर्वीच ठिकठिकाणी त्यांची धरपकड करण्यात आली.

तब्बल २८ हजार महाराष्ट्र सैनिकांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक नोटिसा बजावल्या, हजारोंना तडीपार केलं आणि अनेकांना तुरुंगात डांबलं. कशासाठी? ध्वनिप्रदूषण करणारे, लोकांना त्रास देणारे मशिदींवरचे अनधिकृत भोंगे उतरवले जाऊ नयेत यासाठी! गेला आठवडाभर महाराष्ट्र सैनिकांची दडपणूक करण्यासाठी राज्य सरकार ज्या पद्धतीने पोलीस बळाचा वापर करत आहे

ते पाहता मला प्रश्न पडलाय की; मशिदींमध्ये लपवून ठेवलेली शस्त्रास्त्रे आणि अतिरेकी शोधून काढण्यासाठी अशी ‘धरपकड मोहीम’ राज्य सरकारने किंवा पोलिसांनी कधी राबवली होती का? आमचा संदीप देशपांडे आणि इतरही अनेक कार्यकर्त्यांना पोलीस असे काही शोधत आहेत,

जणू ते पाकिस्तानातून आलेले अतिरेकी किंवा निजामाच्या हैद्राबाद संस्थानातले ‘रझाकार’ आहेत! अर्थात, महाराष्ट्र सैनिकांविरोधात ही अत्याचारी, दमनकारी कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना कुणी दिलेत हे समस्त मराठीजन, तमाम हिंदूजन उघड्या डोळ्यांनी बघत आहेत.

राज्य सरकारला माझं एकच सांगणं आहे; आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. सत्ता येत-जात असते. कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही. उद्धव ठाकरे, तुम्हीही नाही!

Previous Post

ईडीचा साताऱ्यात झटका..! मायणी मेडिकल कॉलेजचे तत्कालीन चेअरमन एम. आर. देशमुखला अटक..

Next Post

कुस्ती, कबड्डी, खो-खो व व्हॉलीबॉल स्पर्धांच्या बक्षिसासाठी पुढील वर्षापासून 1 कोटीचा निधी देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
कुस्ती, कबड्डी, खो-खो व व्हॉलीबॉल स्पर्धांच्या बक्षिसासाठी पुढील वर्षापासून 1 कोटीचा निधी देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

कुस्ती, कबड्डी, खो-खो व व्हॉलीबॉल स्पर्धांच्या बक्षिसासाठी पुढील वर्षापासून 1 कोटीचा निधी देणार - उपमुख्यमंत्री अजित पवार

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group