
कुपवाड प्रतिनिधी | सुरज फाउंडेशन ग्रुप ऑफ नव कृष्णा व्हॅली स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, कुपवाड एमआयडीसीच्या वतीने मा. प्रविणजी लुंकड यांचा 69 वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी त्यांना त्यांच्या शैक्षणिक, क्रीडा व सामाजिक योगदानाबद्दल गौरव करण्यात आला.

क्रीडा व शिक्षण क्षेत्रातील योगदान:
प्रविणजी लुंकड यांनी शिक्षण व क्रीडा क्षेत्रात भरीव योगदाना बद्दल मा राज्यपाल यांच्या हस्ते साई सेवा संस्था मुंबई यांच्या मार्फत ‘क्रीडा रत्न’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांच्या दूरदृष्टीमुळे व प्रेरणेने अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण, कला व क्रीडा या क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करता आली आहे

कार्यक्रमाचा प्रारंभ:
सकाळी नव कृष्णा व्हॅली स्कूलच्या वतीने सांगली जिल्हास्तरीय निमंत्रित क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर जयसिंगपूर येथील ज्ञानगंगा हायस्कूलचा विद्यार्थी अभय भोसले याने नव कृष्णा व्हॅली स्कूलच्या एकाच वेळी 10 विद्यार्थ्यांशी बुद्धिबळ खेळून विजय संपादन केला. त्याचा रोख रक्कम व पारितोषिक देऊन गौरवण्यात आले .
सांस्कृतिक व आनंदाचा सोहळा:
वाढदिवसानिमित्त ऑनलाईन पद्धतीने केक कटिंग करण्यात आले. विद्यार्थ्यांना व्यायामाची आवड वृद्धिंगत व्हावी हा हेतू ठेवून सर्व मुलांना रोप स्किपिंग भेट म्हणून देण्यात आले. संस्थेच्या संचालिका सौ. संगीता पागनीस यांनी प्रविणजी लुंकड यांच्यावर कविता सादर केली. एन. जी. कामत यांनी शुभेच्छा देत मुलांना मार्गदर्शन केले.
नेत्र तपासणी व स्त्री रोग आरोग्य तपासणी
सुरज फौंडेशनचे संस्थापक ट्रस्टी माननीय श्री प्रवीण लुंकड सरांच्या 69 व्या वाढदिवसानिमित्त आज मराठी माध्यम मध्ये नेत्र तपासणी व महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली
यामध्ये नेत्रतज्ञ डॉक्टर सुरेश वाघ यांच्या सुदर्शन मल्टी स्पेशालिटी आय हॉस्पिटल सांगली यांच्या वतीने विद्यार्थी व पालक यांची नेत्र तपासणी तसेच मा. डॉ.श्री. सुभाष कोळेकर (स्त्रीरोग तज्ञ ) व डॉ. श्री. संतोष आवळे यांच्यामार्फत स्त्रीआरोग्य तपासणी करणेत आली. या शिबिराचा सर्व पालक, विध्यार्थी, सुरज फौंडेशन चे सर्व पदाधिकारी व कर्मचारी यांनी लाभ घेतला.
मान्यवरांचा सहभाग
कार्यक्रमाला संस्थेचे पदाधिकारी, शिक्षकवृंद, तसेच चिदंबर कोटी, भास्कर रमेश चराटे, दीपक वायचळ यांसारखे मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमासाठी मा. अधिकराव पवार प्राचार्य नव कृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यम. उपप्राचार्य प्रशांत चव्हाण, एडमिन ऑफिसर रघुनाथ सातपुते, आयटी इन्चार्ज राजेंद्र पाचोरे व दत्तात्रय मुळे. अकाउंट विभाग प्रमुख श्रीशैल मोटगी,आयआयटी मेडिकल च्या प्रमुख अश्विनी माने व गुरुकुल वसतिगृहाचे प्रमुख प्रदीप पाटील तसेच स्पोर्ट्स इन्चार्ज विनायक जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.