• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

हुपरीतील एकाच कुटुंबातील चौघे राजस्थान येथील अपघातात ठार

Admin by Admin
November 16, 2024
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
हुपरीतील एकाच कुटुंबातील चौघे राजस्थान येथील अपघातात ठार
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

हुपरी : येथील संभाजी मानेनगरमधील एकाच कुटुंबातील चारजणांचा राजस्थामधील पाली येथे झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला. यामध्ये बाबुराव चव्हाण (वय 50), त्यांच्या पत्नी सौ. सारिका चव्हाण (38), मुलगी साक्षी (19) आणि मुलगा संस्कार (17) या चौघांचा मृत्यू झाला, तर पट्टणकोडोली येथील प्रमोद पुरंदर वळिवडे (40) व रवींद्र डेळेकर (32) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

ही घटना गुरुवारी रात्री घडली. हुपरी येथील हे कुटुंबीय सुट्टीत देवदर्शनासाठी गेले होते. जोधपूर पाहण्यासाठी गेल्यानंतर हा अपघात झाला.

बाबुराव चव्हाण गेल्या अनेक वर्षांपासून चांदीचे दागिने तयार करण्याचे काम करतात. त्यांचे भाऊ दत्तात्रय चव्हाण व ते दोघे एकत्रच व्यवसाय करतात. त्यांचे आदमापूर येथे ज्वेलर्स दुकानही आहे. दिवाळीनंतर सुट्टीसाठी ते मंगळवारी (दि. 12) राजस्थानला गेले होते. पत्नी, मुलगी आणि मुलासह ते रेल्वेने गेले होते. तिथे उद्योजकांना भेटले. काही प्रेक्षणीय स्थळेही पाहिली. तिथे त्यांना जुने व्यापारी भेटले. त्यामुळे त्यांची चारचाकी घेऊन जोधपूर पाहण्यासाठी गेले होते. जोधपूरला जात असताना रात्री पाली जिल्ह्यातील केनपुरा गावाजवळ चारचाकी झाडावर आदळून भीषण अपघात झाला. या अपघातात चौघांचाही जागीच मृत्यू झाला, तर पट्टणकोडोली येथील प्रमोद वळिवडे व रवींद्र डेळेकर हे दोघे गंभीर जखमी असून, त्यांना पाली जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. सध्या जखमींची प्रकृती सुधारत आहे. बाबुराव व दत्तात्रय हे दोघे भाऊ प्रामाणिकपणे व्यवसाय करीत होते. त्यांच्या सुखी संसारावर काळाने मोठा घाला घातला. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.

Previous Post

मोठी बातमी | महाराष्ट्रात सत्तेत ‘हे’ येणार.? कोणाला किती जागा मिळतील.? धक्कादायक माहिती गोपनीय खबऱ्यावर..! वाचा सविस्तर 

Next Post

सांगली जिल्ह्यात प्रतिस्पर्धी उमेदवारांवर ‘वॉच’, हेरगिरीसाठी ‘गोपनीय खबऱ्या’ तर काही ठिकाणी खास माणसे..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली जिल्ह्यात प्रतिस्पर्धी उमेदवारांवर ‘वॉच’, हेरगिरीसाठी ‘गोपनीय खबऱ्या’ तर काही ठिकाणी खास माणसे..!

सांगली जिल्ह्यात प्रतिस्पर्धी उमेदवारांवर 'वॉच', हेरगिरीसाठी 'गोपनीय खबऱ्या' तर काही ठिकाणी खास माणसे..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group