• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

अचानक फोन वाजला : सांगलीची ‘या’ विभागाच्या प्रमुखांनी केली निवड, सांगलीकर जाम खुश..!

हे केवळ मनोरंजन म्हणून वाचावे, यामध्ये शहरातील विकासकामांच्या बाबतीत चिमटा काढण्यात आला आहे. याची थोडी लाज लोकप्रतिनिधी यांनाही वाटायलाच हवी.

Admin by Admin
October 27, 2024
in माफ करा स्पष्ट बोलतो
1 min read
0
अचानक फोन वाजला : सांगलीची ‘या’ विभागाच्या प्रमुखांनी केली निवड, सांगलीकर जाम खुश..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

#सिक्रेट_न्यूज / @गोपनीय खबऱ्या #khabarya

माहिष्मती साम्राज्यातल्या ‘सांगा मी कुणाची’ नगरीच्या कारभाऱ्यांच्या दालनातील दुरध्वनी खणखणला. साहेबांच्या एका हुजऱ्यानं तो उचलून कानाला लावला, पलिकडून नाजूक आवाजात विचारणा झाली “ साहेब आहेत का? देशाच्या अवकाश संशोधन कार्यक्रम प्रमुखांना साहेबांशी बोलायचं आहे.”

हे काय प्रकरण ते त्या हुजऱ्याच्या अल्पबुद्धीला समजलं नाही पण देशाच्या कसल्यातरी संस्थेच्या प्रमुखाचा फोन हे शब्द ऐकल्यामुळं तत्परतेनं त्यानं फोन मुख्य कारभाऱ्यांना दिला.
पलिकडून भरदार आवाजात बोलणं चालू झालं
“नमस्कार, मी अवकाश संशोधन संस्थेचा प्रमुख बोलतोय. आम्ही देशभरातल्या शहरातील रस्त्यांचा आणि वातावरणाचा सर्व्हे केला. त्यातून तुमच्या शहराची निवड आम्ही केलेली आहे.”

एवढं ऐकल्यावर कारभाऱ्यांची छाती अभिनानानं फुलून आली, मान गर्वानं ताठ झाली, त्यांनी विचारलं “कोणत्या कामगिरीसाठी निवड झाली आहे आमच्या सुंदर शहराची?” पलिकडून उत्तर आलं “अभ्यासाअंती आमच्या टिमच्या लक्षात असं आलं की तुमच्या शहरातले रस्ते हे आमचं चंद्रयान आणि मंगळयान-२ यांच्या टेस्टराईड साठी अत्यंत योग्य असे आहेत. पण तुम्हाला पुढची दोन वर्षं तरी त्या रस्त्यांची स्थिती आहे तशीच ठेवावी लागेल ते दुरूस्त करता येणार नाही आणि आपल्यातलं हे बोलणं तुम्हाला गुपित ठेवावं लागेल. बदल्यात आम्ही तुमची देशरत्न पुरस्कारासाठी शिफारस करू.”
साहेब या प्रस्तावानं भाराऊन गेले, नाही म्हणायचा सवालच नव्हता. देश सेवेची एवढी मोठी संधी चालून आलेली असताना एखादा करंटाच अशी संधी नाकारेल. साहेबांनी रूद्ध कंठानं सांगितलं “देशसेवेत आमचा देह पडला तरी चालेल, दोनच काय पुढची दहा वर्षं आम्ही रस्त्यावरून डांबराची गाडीसुद्धा जाऊ देणार नाही.” केवळ आणि केवळ याच कारणासाठी नगरीतले रस्ते खराब आहेत.

  • टीप : ही अत्यंत गोपणीय माहिती आमचे गुप्त शोध पत्रकार कायकिणी आप्पा यांनी जीवावर उदार होऊन शोधून आणली आहे. अत्यंत गोपनीय असल्यामुळं ही बातमी आम्ही वृत्तपत्रात छापू शकत नाही म्हणून आमच्या जिज्ञासू वाचकांसाठी या माध्यमावर देत आहोत.

तळटीप:

1. रात्रीच्यावेळी रस्त्यावरून मोठमोठे आवाज येत असतील तर ते चांद्रयान किंवा मंगळ यानाचे असतात.

2. चंद्रावर आणि मंगळावर लाईट नसल्यामुळे यानांना अंधाराची सवय व्हावी म्हणून स्ट्रीटलाईट्स बंद ठेवण्यात येतात. थकित लाईट बिलाशी याचा संबंध नाही.

3. कदाचित मंगळावर एलियन असल्यास मंगळयान दचकू नये त्याला याची सवय असावी म्हणून गायी, कुत्री व डूकरे यांना रस्त्यांवर मोकाट सोडण्यात आलेलं आहे.-

आपला डीॲक्टीव्ह संपादक–  अभिजीत पोरे @सांगा मी कुणाची वृत्तसेवा

Previous Post

ब्रेकिंग | पश्चिम महाराष्ट्रात धिंगाणा – काँग्रेसने उमेदवार जाहीर करताच मोठी दगडफेक, जोरदार राडा : वाचा सविस्तर

Next Post

मोठी बातमी | “देवेंद्र फडणवीस यांच्याशी दुश्मनी नाही, ते आमचे.” महाविकास आघाडीतील ‘या’ बड्या नेत्याच्या वक्तव्याने सर्वत्र खळबळ..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी बातमी | “देवेंद्र फडणवीस यांच्याशी दुश्मनी नाही, ते आमचे.” महाविकास आघाडीतील ‘या’ बड्या नेत्याच्या वक्तव्याने सर्वत्र खळबळ..!

मोठी बातमी | "देवेंद्र फडणवीस यांच्याशी दुश्मनी नाही, ते आमचे." महाविकास आघाडीतील 'या' बड्या नेत्याच्या वक्तव्याने सर्वत्र खळबळ..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group