
-
माजी महापौरासह दिग्गज नगरसेवकांची उपस्थिती!
मिरजेत चार दिवसांपूर्वी एका नेत्याच्या फार्महाऊसवर नेत्यांना रंगत चढल्याची चर्चा शहरात जोर धरू लागली आहे. राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत रात्री ही बैठक पार पडल्याचे वृत्त विश्वसनीय सूत्रांनी दिले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने इच्छुक असणाऱ्या नेत्यांची शिफारस करण्यासाठी ही मंडळी जमल्याचे सांगण्यात येत आहे.


या बैठकीदरम्यान ‘मिरज पॅटर्न’ मधील बहुचर्चेत असणाऱ्या ‘बापू’जींना बाजूला करून एका नेत्याने ‘बाग’ फुलविण्यासाठी टेंडर घेतल्याचं समजते आहे. यावेळी ‘आनंद’ गगनात मावेनासा झाला होता. तर हास्यसम्राट ‘दादा’च्या विनोदी किस्स्याने चांगलीच रंगत आणली होती. अजूनही आमदारकीचे डोहाळे असलेल्या ‘बाळा’ला जयंतरावांनी हिरवा रंग दाखविला नसून, सध्या तरी तांबड्या रंगाशी एकनिष्ठ राहण्याचा सल्ला दिला आहे. तर याच बैठकीत ‘उद्योगपती’ला कंगाल करण्याची शपथ घेतल्याची माहिती मिळत आहे. कर्तृत्व ‘सिद्ध’ करून त्याचा ‘अर्थ’पूर्ण बाजार उठविणार असून ‘उध्वस्त’ करण्याचे आदेश येईपर्यंत सर्वजण प्रतीक्षेत असल्याचं सुत्रांनी संगितले आहे.