• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग | विशाल पाटील यांनी ‘इथे’ नवा डिजिटल फलक लावला.. वाचा सविस्तर

Admin by Admin
April 13, 2024
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
ब्रेकिंग | विशाल पाटील यांनी ‘इथे’ नवा डिजिटल फलक लावला.. वाचा सविस्तर
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगली प्रतिनिधी | खबऱ्या ऑनलाईन – सांगली लोकसभेची विशाल पाटील यांना काँग्रेसने उमेदवारी न दिल्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या नावातील ‘काँग्रेस’ शब्दावर पांढरा रंग फासला होता.

दुसऱ्याच दिवशी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी काँग्रेस भवनला भेट देऊन जिल्हा काँग्रेस कमिटीचा नवा डिजिटल फलक लावला. विशाल पाटील यांनी कार्यकर्त्यांनी संयम ठेवण्याचे आवाहन केले आहे.

सांगलीत शुक्रवारी मिरज तालुका काँग्रेस कमिटीची बैठक संपल्यानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी ‘सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी’ या नामफलकावरील ‘काँग्रेस’ या शब्दाला पांढरा रंग फासला होता. त्यानंतर शनिवारी विशाल पाटील यांनी कार्यकर्त्यांसह काँग्रेस भवन येथे येऊन जिल्हा काँग्रेस कमिटी असा नवा डिजिटल फलक लावला. तसेच कार्यकर्त्यांना त्यांनी शांततेची भूमिका घेण्याची सूचना दिली.

विशाल पाटील म्हणाले, आम्ही काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेऊ शकतो; परंतु कार्यकर्त्यांनी आपला राग आमच्यावर काढावा, काँग्रेस पक्षावर नको. कदाचित वैयक्तिक मी कुठेतरी कमी पडल्यामुळे हे सारे घडले आहे; परंतु देशपातळीवरील राजकारण करीत असताना, काही कटू निर्णय घ्यावे लागतात. सांगलीच्या जागेबाबत अजूनही आम्ही सकारात्मक आहोत. कार्यकर्त्यांनी पक्षावरील निष्ठा ढळू देऊ नये, असेही त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले.

काँग्रेस पक्षावर आमचा विश्वास : विशाल पाटील

जिल्ह्यात काँग्रेस पक्ष मजबूत करण्याचे आम्ही प्रामाणिकपणे काम करत आहे. पक्षाकडे सांगली लोकसभेची उमेदवारी मागितली होती. मुंबई, दिल्लीतील नेत्यांची चर्चाही केल्या आहेत. अजूनही मी सांगलीच्या जागेबद्दल सकारात्मक आहे. पक्ष आणि महाविकास आघाडीचे नेते अजूनही सांगलीची जागा काँग्रेसला सोडण्याबाबत फेरविचार करतील, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी व्यक्त केला.

Previous Post

मिरज ब्रेकिंग | गांजा-नशेच्या गोळ्याचा साठा जप्त, तरूणास अटक

Next Post

ब्रेकिंग | विशाल पाटलांनी सांगलीत लढायची हिंमत दाखवली तर पाठिंबा देऊ, निवडूनही आणू; प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी ब्रेकिंग | सांगलीतील राजकारणात भूकंप होणार..! काँग्रेसची ही भूमिका.. म्हणाले, “आम्ही…..!”

ब्रेकिंग | विशाल पाटलांनी सांगलीत लढायची हिंमत दाखवली तर पाठिंबा देऊ, निवडूनही आणू; प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group