• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मोठी ब्रेकिंग | विशाल पाटील यांना राज्यसभेवर पाठवण्याची तयारी, महाविकास आघाडीकडून ‘मास्टरप्लॅन’..?

Admin by Admin
April 5, 2024
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
मोठी ब्रेकिंग | सांगलीतील राजकारणात भूकंप होणार..! काँग्रेसची ही भूमिका.. म्हणाले, “आम्ही…..!”
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली प्रतिनिधी | खबऱ्या ऑनलाईन : सांगलीच्या जागेवरुन मोठी ठिणगी पडण्याची शक्यता आहे. शिवसेना उद्धव ठाकरेंनी उमेदवार जाहीर केल्यानंतरही सांगली लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवावी यासाठी काँग्रेस पक्ष अजूनही ठाम आहे.

मात्र विशाल पाटील यांना लोकसभेऐवजी राज्यसभेवर पाठवण्याच्या पर्यायावर सध्याा मविआचे नेते विचार करत असल्याचं माहिती समोर आली आहे. विशाल पाटील यांना राज्यसभेवर पाठवल्याने विशाल पाटील आणि काँग्रेस नेते कार्यकर्ते पदाधिकारी यांची यांची नाराजी दूर करण्यासाठी महाविकास आघाडीकडून पर्याय काँग्रेस पक्षाला देण्यात आल्याची माहिती आहे.

सांगली लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गट काँग्रेस पक्षाची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. विशाल पाटील यांचा यामध्ये विशेष विचार करून त्यांचं राजकीय पुनर्वसन कशाप्रकारे करता येईल यासाठी यासाठी महाविकास आघाडीने हा पर्याय काढला आहे राज्यसभेव्यतिरिक्त दुसरा पर्याय देखील विचाराधीन आहे, आणि तो म्हणजे विधानसभा निवडणुकीत विशाल पाटील यांना उमेदवारी मिळाली तर त्यांना पूर्ण पाठिंबा दिला जाईल.. यावर अंतिम निर्णय काय होतो ते पाहायचं.

काय आहे महाविकास आघाडीचा प्लॅन.?

लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीकडून विशाल पाटील यांना राज्यसभेवर पाठवण्यासंदर्भातील पर्याय किंवा पुढे विधानसभा निवडणुकीत विशाल पाटील उमेदवार असल्यास त्यांना पूर्णपणे पाठिंबा देण्याचा निर्णय नेत्यांकडून घेतला जातोय. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून अशा प्रकारचा प्रस्ताव दिल्लीतील काँग्रेस वरिष्ठ नेत्यांना पाठवण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. मात्र काँग्रेस पक्षश्रेष्ठीकडून या संदर्भात प्रतिसाद अद्याप आला नसल्याची माहिती आहे. तर काँग्रेस पक्षांकडून या प्रस्तावावर सकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि या प्रस्तावावर विशाल पाटील यांची नाराजी दूर झाली तर महाविकास आघाडी एकत्रित चंद्रहार पाटील यांचा प्रचार करेल अशी अपेक्षा महाविकास आघाडीचे नेत्यांना आहे.

संजय राऊत यांच्या सांगली दौऱ्याला काँग्रेस नेत्यांची पाठ

सांगली जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते दौऱ्याला पाठ फिरवली आहे. विशाल पाटील हे मुंबई आहेत तर,विश्वजीत कदम हे पुण्यात आहेत. सांगली जिल्ह्याचे काँग्रेस अध्यक्ष विक्रम सावंत हे जत या मतदार संघात आहेत. सांगली लोकसभा मतदार संघावर काँग्रेसकडून दावा करण्यात आला आहे. या लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडी मधे मैत्रीपूर्ण लढत घेण्यात यावी असा प्रस्ताव राज्यातील काँग्रेस नेत्यांनी दिला होता पण त्यावर अजून दिल्लीतील काँग्रेस नेत्यांकडून उत्तर आलं नाही आहे. सांगलीतील काँग्रेस नेत्यांची ठाकरे गटावर नाराजी आहे.

Previous Post

सांगली | जुन्या भांडणातून तरूणाचा खून, संशयित आरोपीस अटक

Next Post

सांगली ब्रेकिंग | लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर ‘या’ नेत्याने दिला बहिष्काराचा इशारा

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी ब्रेकिंग | सांगलीतील राजकारणात भूकंप होणार..! काँग्रेसची ही भूमिका.. म्हणाले, “आम्ही…..!”

सांगली ब्रेकिंग | लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर 'या' नेत्याने दिला बहिष्काराचा इशारा

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group