• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

राज्यातील बड्या IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पहा कोणाची झाली कुठे बदली.

Admin by Admin
April 20, 2022
in मंत्रालय
1 min read
0
राज्यातील बड्या IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पहा कोणाची झाली कुठे बदली.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : राज्यातील मोठ्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या (IPS Officer) बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात मुंबई गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे, पिंपरी चिंडवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश ( Krishna Prakash ) यांचा समावेश आहे.

नाशिक शहराचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी काही दिवसांपूर्वीच बदलीची मागणी केली होती. घरगुती कारणांमुळे बदली करण्याची विनंती त्यांनी केली होती. त्यानुसार आता त्यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आता नाशिक पोलीस आयुक्त म्हणून जयंत नाईकनवरे (Jayant Naiknavre) यांची नियुक्ती करण्यात आलीय. त्याचबरोबर पिंपरी चिंचवडचे धडाकेबाज पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांचीही बदली झालीय. त्यांच्या जागी आता अंकुश शिंदे हे पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारणार आहेत. कृष्ण प्रकाश यांची विशेष पोलीस महानिरीक्षक VIP सुरक्षा, मुंबई इथं बदली करण्यात आली आहे.

संदीप कर्णिक पुण्याचे नवे सह पोलीस आयुक्त

संदीप कर्णिक पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक असताना माळवमध्ये आंदोलक शेतकऱ्यांवर गोळीबार झाला होता. त्या घटनेमुळं राज्याचं राजकारण हादरुन गेलं होतं. त्यानंतर संदीप कर्णिक यांची तातडीने बदली करण्यात आली होती. त्यानंतर आता कर्णिक यांची पु्ण्याचे नवे सह पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंबई गुन्हे शाखेचे सह पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांना पदोन्नती देण्यात आलीय. त्यांच्या जागी सुहास वारके यांच्याकडे मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सह पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

उस्मानाबादच्या जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती नीवा जैन यांचीही बैदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आता अक्षय शिंदे हे उस्मानाबादचे नवे पोलीस अधीक्षक असणार आहेत.

Previous Post

कर्नाटकची एस टी जप्त, सांगली कोर्टाचा दणका…

Next Post

महिला पोलीस कर्मचाऱ्यावरच दाखल झाला सावकारकीचा गुन्हा, ११ जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई होण्याची शक्यता..?

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
महिला पोलीस कर्मचाऱ्यावरच दाखल झाला सावकारकीचा गुन्हा, ११ जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई होण्याची शक्यता..?

महिला पोलीस कर्मचाऱ्यावरच दाखल झाला सावकारकीचा गुन्हा, ११ जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई होण्याची शक्यता..?

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group