• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली| अमोल मिटकरींकडून ‘खाज’ साहेब असा उल्लेख, इस्लामपुरात राज ठाकरेंची नक्कल..

Admin by Admin
April 20, 2022
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
सांगली| अमोल मिटकरींकडून ‘खाज’ साहेब असा उल्लेख, इस्लामपुरात राज ठाकरेंची नक्कल..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

इस्लामपूर – गोपनीय खबऱ्या:/मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर भाजपची बी टीम असल्याचा आरोप असतानाच राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी पुन्हा एकदा मनसेवर टिका केली आहे.

विशेष म्हणजे मिटकरींनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीतच भाषण करताना, राज ठाकरेंचा उल्लेख खाज ठाकरे असा केला. त्यानंतर, आपण कुणाला घाबरत नाही, त्यांची आणि भाजपची लावारीस कार्टी धमक्या देण्याशिवाय काही करू शकत नाही, असे म्हणत मनसेच्या ट्रोलर्संनाही टोला लगावला.

अमोल मिटकरी यांनी इस्लामपूरच्या सभेत भाजपसह मनसेवर जोरदार टिका केली. भाजपची बी टीम एमआयएम आम्ही ऐकलं होतं, आता भाजपची सी टीम आली आहे. राज ठाकरेंनी अगोदर मराठीचा मुद्दा उपस्थित केला. त्यासाठी, शिवाजी महाराजांचा मुद्दा उपस्थित केला, असे म्हणत मिटकरींनी राज ठाकरेंची नक्कलही करून दाखवली. मनसेचा 5 रंगाचा झेंडा आता एका रंगावर आलाय. त्यावर राजमुद्रा आहे, पण त्यांच्याच पक्षाच्या एकाला मी राजमुद्रा विचारली, तर आम्हाला नाही विचारायचं असं त्यांनी म्हटल्याचा किस्साही मिटकरी यांनी सांगितला. 14 आमदारांवरुन तुमचा पक्ष 1 आमदारावर ऐऊन ठेपलाय, आता तर मुस्लीम मतदारही तुमच्याकडून दुरावलाय, असेही मिटकरींनी म्हटलं.

हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या इस्लामपूर येथिल राष्ट्रवादी परिवार संवाद सभेमध्ये आवाहन केल्यावर खुले नाट्यगृहातील हजारो लोकांनी मोबाईलचे लाईट लाऊन अनोखी तेजस्वी सामूहिक ज्योत प्रज्वलित केली, इस्लामपुर येथून निर्माण झालेला विचार दिल्लिश्र्वराला एक दिवस झुकायला भाग पाडेल. pic.twitter.com/szrnaaWoCz

— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) April 19, 2022

 

अमोल मिटकरींनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मोहित कंबोज यांच्यासह गुणरत्न सदावर्तेंवरही टिका केली. गोवा जिंकल्यानंतर नागपुरात रॅली काढणारे फडणवीस कोल्हापूरच्या पराभवानंतर गायब झाल्याचं दिसून आल्याचंही त्यांनी म्हटलं.

लाव रे तो व्हिडिओ

अमोल मिटकरींनी इस्लामपूरच्या सभेत लाव रे तो व्हिडिओचा प्रयोगही त्यांनी केला. त्यामध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवार यांनी मुंबईला अंडरवर्ल्डपासून कसं वाचवलं हे सांगितलं होतं. तर, दुसऱ्या व्हिडिओत अलटबिहारी वाजपेयी यांनी शरद पवार यांनी कच्छच्या भूकंपावेळी दिलेल्या योगदानाचं कौतूक केलं.

Previous Post

सांगली | संवाद यात्रा संपताच भाजप कडून ‘पोलखोल ‘..?

Next Post

कर्नाटकची एस टी जप्त, सांगली कोर्टाचा दणका…

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
कर्नाटकची एस टी जप्त, सांगली कोर्टाचा दणका…

कर्नाटकची एस टी जप्त, सांगली कोर्टाचा दणका...

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group