सांगली : पक्षांतर बंदी कायद्याचे राज्यात उल्लंघन झालं आहे, मात्र ते कोणी मान्य करायला तयार नाहीत, न्यायलाने सांगून देखील विलंब लावला जातोय, आता १० तारखेची मुदत दिली आहे, यावेळी देखील राहुल नार्वेकर यांचा निर्णय राजकीय असेल, असे मत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.यावेळी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व वसंतदादा सहकारी साखर करखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील उपस्थित होते.
ते म्हणाले, ” न्यायालयाने मुदत दिलेली असल्याने नार्वेकर यांना निर्णय घ्यावाच लागेल, मात्र ते विधानसभेचे अध्यक्ष असले तरी एका पक्षाचे आमदार आहेत, त्यांनी घेतलेला निर्णय पूर्णतः राजकीय निर्णय असेल हा माझा विश्वास आहे, त्यानंतर सर्वोच्च न्यायालय काही निर्णय घेईल का ? हे पाहावे लागणार आहे.”
ते म्हणाले , “लोकसभेच्या निवडणुकीत आमची भूमिका स्पष्ट आहे, महविकास आघाडीने लढलेल्या निवडणुकीत यश आल्याने भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका टाळल्या. झालेल्या निवडणुकीत एकही असे राज्य नाही, जिथे त्यांची संख्या तवाढलेली नाही. त्यामुळेच भाजपने महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित केले आहे, २३ जागा आहेत, त्यात भर घालण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. महविकास आघाडी विरोधात दहा सुद्धा जागा येतील अशी परिस्थिती होती, म्हणूनच त्यांनी राज्यात नवनवे प्रयोग केले.”
शिवसेनेच्या सत्तांतर करून भागणार नाही, म्हणून पुन्हा राष्ट्रवादी फोडली. आता तिकडे नेते गेले, मात्र कार्यकर्ते, सामान्य मतदार हे गेलेले नाहीत, त्यांना झालेला प्रकार आवडलेला नाही. नेते वयक्तिक स्वार्थासाठी गेले आहेत, लोकांना गद्दारी आवडलेली नाही, अशी फितुरी जनतेला कधीही राज्यात रुचलेली नाही, लोकांची फसवणूक केलेल्याना मतदार साथ देतील असे मला वाटत नाही.”
भाजपला लोकमत नाही..
ते म्हणाले, “निवडणुकीचे गणित साधे आहे, सन २०१४ मध्ये भाजपला ३१ टक्के तर सन २०१९ मध्ये ३७ टक्के मतदान झाले होते, बालकोट प्रकरणामुळे २०१९ ला मते वाढली होती, आता तसे वातावरण नाही. राम मंदिराच्या बाबतीत राजीव गांधी यांनीच पाहिल्याना मंदिराचे दरवाजे उघडले होते, मात्र न्यायालयाकडून ज्यांना जमीन मिळेल, त्यांना समर्थन काँग्रेस करेल अशी भूमिका होती, तीच आहे. सध्या खासगी ट्रस्टच्या माध्यमातून मंदिर उभा राहत आहे, याचा आनंद आहे, पण निवडणुकीत रोजगार, महागाई, भ्रष्टाचार या मुद्द्यांवर निवडणुका होतील.
एकास एक उमेदवार देण्यावर भर..
भाजपच्या विरोधात जास्तीत जास्त उमेदवार उभे करण्यासाठी मोदी प्रयत्न करीत आहेत, मात्र ही मत विभागणी टाळण्यासाठी आम्ही इंडिया आघाडी प्रयत्न करीत आहोत. मात्र आम्ही एकास एक उमेदवार देण्याकजा प्रयत्न करीत आहोत.
जास्तीत जास्त लोक उभा करून मताची विभागणी केली जाणार आहे, पण लोकांनी आता या रणनीतीला बळी पडू नये.
- * ईडी, दहशत, धमक्या याचे प्रयत्न सुरू आहेत.
- * मराठा आंदोलकाना सरकारने योग्य वागणूक द्यावी, अन्यथा गंभीर परिणाम
- * ओबीसी विरुद्ध मराठा भांडणे लावण्याचे काम सध्या सुरू आहेत.
- * ईव्हीएम बाबत।लोकांना शंका आहे, बऱ्याच देशांनी नाकारले आहे. लोकांना शंका असेल तर पेपर बेस निवडणुका व्हाव्यात अशी आमची मागणी आहे.
- * प्रामाणिकपणे लढणार असाल, तर वंचितने इंडिया आघाडीशी चर्चा करावी, केवळ मीडियात बोलून काही होणार नाही.
- * लोकशाही धोक्यात आली आहे. रशियाने पुतीनने केले, चीनने केले, ते आता भारतात होईल की काय अशी भीती वाटू लागलीय.

