• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगलीत एकाच दिवशी चार घरफोड्या..

Admin by Admin
April 13, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
सांगलीत एकाच दिवशी चार घरफोड्या..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली; खबऱ्या प्रतिनिधी : गेल्या दोन दिवसांपासून सांगली शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. शहरातील चार ठिकाणी घरफोडी करून दागिने, रोख रक्कम, मोबाईल असा सुमारे दीड लाखांचा मुद्देमाल लंपास केला आहे.

याबाबत संबंधितांनी सांगली शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी सांगितले, सांगलीवाडी येथेे आनंद सीताराम पाटील यांच्या बंद असलेल्या घराचा मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी 74 हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व काही रोख रक्कम घेऊन पोबारा केला. हा प्रकार सोमवारी भरदिवसा घडला. याबाबत पाटील यांनी सांगली शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

येथील शिवशंभू चौकातील शिवनगर येथे फरोज सलीम महात यांच्या घराचा मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. घरातून चांदीचे दागिने रोख रक्कम, असा मुद्देमाल लंपास केला. हा प्रकारही सोमवारी दुपारी दीड ते दोन या दरम्यान घडला.

वखार भागात घराचा दरवाजा अर्धवट उघडा असल्याची संधी साधून चोरट्यांनी तोळ्याचे मंगळसूत्र आणि रोकड चोरून नेली आहे. ही घटना रविवारी पहाटे घडली. याप्रकरणी मनोज किसन सुतार यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे. हळदभवननजीक सुतार हे कुटुंबासह राहतात. रविवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. चोरट्याने एक तोळा सोन्याचे मंगळसूत्र आणि तीनशे रुपयांची रोकड घेऊन पोबारा केला आहे. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा केला असून दोन साक्षीदार तपासले आहेत.

वखार भागातील त्रिमूर्ती चित्रमंदिरजवळ बल्लू हणमंत कातरल हे कुटुंबासह एका पत्र्याच्या शेडमध्ये राहतात. त्यांच्या शेडच्या दरवाजाची साखळी काढून चोरट्याने त्यांचे दोन मोबाईल चोरून नेले. या घटनेची नोंद शहर पोलिसांनी घेतली आहे.

मोबाईल, दुचाकी चोरीचे वाढते प्रकार

गेल्या काही दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात मोबाईल आणि दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले आहे. यातील अनेक गुन्ह्यांचा छडा अद्याप लागलेला नाही. त्यातच आता बंद असलेली घरे फोडली जात आहेत. त्यामुळे पोलिसांच्या समोर चोरट्यांचे आव्हान आहे.

Previous Post

बहुचर्चित, मंडल अधिकाऱ्याच्या कानशिलात वाजवली..! प्रकरण दडपण्याचा प्रकार सुरू..?

Next Post

‘नवरी मिळे ना नवऱ्याला’ पस्तीशी ओलांडली तरी अनेक युवक अविवाहितचं….

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
‘नवरी मिळे ना नवऱ्याला’ पस्तीशी ओलांडली तरी अनेक युवक अविवाहितचं….

'नवरी मिळे ना नवऱ्याला' पस्तीशी ओलांडली तरी अनेक युवक अविवाहितचं....

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group