• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

हिंगोलीत भर दिवसा गोळीबाराचा थरार, भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षावर जीवघेणा हल्ला

Admin by Admin
August 1, 2023
in क्राईम, राजकीय
1 min read
0
हिंगोलीत भर दिवसा गोळीबाराचा थरार, भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षावर जीवघेणा हल्ला
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

हिंगोली प्रतिनिधी | हिंगोली जिल्हा आज गोळीबाराच्या घटनेमुळे हादरला. विशेष म्हणजे हिंगोली जिल्हा परिषदेच्या आवारातच हा गोळीबार झाला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. अज्ञात आरोपीने भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण यांच्यावर गोळीबार केला. संबंधित गोळीबाराची घटना ही आज दुपारी तीन ते सव्वा तीन वाजेच्या सुमारास घडली. गोळीबाराच्या या घटनेमुळे जिल्हा परिषदेच्या आवारात एकच खळबळ उडाली.

अज्ञात आरोपीने तीन गोळ्या झाडल्याची माहिती समोर आली आहे. त्यापैकी एक गोळी ही भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण यांच्या पाठीत लागली. या गोळीबाराच्या घटनेत पप्पू चव्हाण गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जवळील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले.

रुग्णालयाबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
दरम्यान, या घटनेची माहिती संपूर्ण जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरली. पप्पू चव्हाण यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी संबंधित रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी केली. भाजपचे कार्यकर्ते, आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्यासह भाजपचे इतर पदाधिकारी रुग्णालयाबाहेर दाखल झाले होते.

दरम्यान, पप्पू चव्हाण यांच्यावर प्रथम उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेड येथे रवाना करण्यात आले.घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक अर्चना पाटील यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल झाला. पोलीस आता या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज चेक करून आरोपीचा शोध घेत आहेत. चव्हाण हे काही कामानिमित्त जिल्हा परिषदेत आले असता ही घटना घडली. या घटनेमुळे हिंगोली शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Previous Post

सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्यांवर कारवाई करता येणार नाही

Next Post

सांगली | शेतकरी संघटनेचा ढाण्या वाघ BRS मध्ये, रघुनाथदादा पाटलांचा चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली | शेतकरी संघटनेचा ढाण्या वाघ BRS मध्ये, रघुनाथदादा पाटलांचा चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

सांगली | शेतकरी संघटनेचा ढाण्या वाघ BRS मध्ये, रघुनाथदादा पाटलांचा चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group