• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवला

मुख्यमंत्र्यांची सचूना : विश्‍वजीत, विक्रम सावंत, पृथ्वीराज पाटील यांची भेट

Admin by Admin
July 26, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, मंत्रालय, राजकीय, सामाजिक
1 min read
0
अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवला
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली ( प्रतिनिधी): अलमट्टी धरणात ८७ टीएमसी पाणीसाठा झाल्यानंतरही अवघ्या सात हजार क्यूसेकने विसर्ग सुरू होता. ही बाब आमदार विश्‍वजीत कदम यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस नेत्यांच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या लक्षात आणून दिली.

मुख्यमंत्र्यांनी कर्नाटकच्या जलसंपदा विभागाशी संपर्क साधत विसर्ग वाढवण्याबाबत आवाहन केले. त्याला प्रतिसाद देत अलमट्टीतून ७५ हजार क्यूसेकने पाणी सोडण्यास सुरूवात झाली.

या शिष्टमंडळात आमदार विक्रम सावंत व शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांचा समावेश होता. त्यांनी परिस्थिती समोर ठेवल्यानंतर हालचाली गतीमान झाल्या. विसर्ग वाढवण्यात आला. त्यामुळे वारणा, पंचगंगा नद्यांतून पाण्याचा वेगवान प्रवाह कृष्णेत मिसळत असला तरी त्याची फूग आता जाणवणार नाही, अशी खात्री श्री. पाटील यांनी व्यक्त केली. सध्या कोयना धरणात ६२ टीएमसी इतका पाणीसाठा असून तेथून १ हजार ५० क्यूसेकने विसर्ग केला जात आहे. कृष्णा नदीची पाणी पातळी सांगलीत आयर्विन पुलाजवळ १९ फुटांवर आहे. कृष्णा नदीची पाणीपातळी वाढत असल्याने दुष्काळी भागासाठीच्या सिंचन योजनादेखील पूर्ण क्षमतेने सुरु कराव्यात, अशी मागणी आमदार विक्रम सावंत यांनी केली.

पावसाळ्यात कोयना व अलमट्टी धरणाच्या साठ्याबाबत दोन्ही राज्यांनी समन्वय ठेवायचा, असे ठरलेले आहे. त्यानुसार कार्यवाही होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर कृष्णा महापूर नियंत्रण समितीचे निवृत्त अभियंता विजयकुमार दिवाण, श्री केंगार व श्री सर्जेराव पाटील त्याकडे लक्ष वेधले. ही बाब पृथ्वीराज पाटील यांच्या कानावर घातली. त्यांनी मुंबईत आमदार विश्‍वजीत कदम यांची भेट घेतली. या प्रश्‍नावर मुख्यमंत्र्यांशी चर्चेची वेळ ठरवली. मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक झाली. कोयनेत ६२ टीएमसी तर अलमट्टीत ८७ टीएमसी पाणीसाठा असून अलमट्टीतून दोन लाख क्यूसेक विसर्ग सुरु करावा, अशी मागणी त्यांनी केली. श्री. शिंदे यांनी तातडीने परिस्थिती समजून घेत सूचना दिल्या.

हलगर्जीपणा नको : पृथ्वीराज पाटील

सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांना कृष्णा महापूर नियंत्रण समितीचे निवृत्त अभियंता विजयकुमार दिवाण, श्री केंगार व श्री सर्जेराव पाटील आणि सहकाऱ्यांनी संपर्क साधला. अलमट्टीकडून हलगर्जीपणा होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली. श्री. पाटील म्हणाले, ‘‘महापुराचे संकट हे महाराष्ट्र-कर्नाटक समन्वयातूनच टाळता येणार आहे. जल आयोगाच्या धोरणापेक्षा अधिक पाणीसाठी अलमट्टीत केला जात आहे, हे आम्ही तात्काळ लक्षात आणून दिले. त्यामुळे त्यांनी विसर्ग वाढवला आहे. पुढेही हलगर्जीपणा नको, अशी आग्रही भूमिका मांडली.’

Previous Post

सर्वात मोठी बातमी! केंद्रीय निवडणूक आयोगाची शरद पवार गटाला नोटीस..

Next Post

मोठी बातमी | मंत्री अब्दुल सत्तार यांचा कारनामा कॅमेऱ्यात कैद

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी बातमी | मंत्री अब्दुल सत्तार यांचा कारनामा कॅमेऱ्यात कैद

मोठी बातमी | मंत्री अब्दुल सत्तार यांचा कारनामा कॅमेऱ्यात कैद

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group