कुपवाड: जैन बांधवांचे श्रद्धास्थान श्री १००८ पार्श्वनाथ भगवान ऐतिहासिक पंचकल्याणक प्रतिष्ठा महामहोत्सव कुपवाड शहरातील दिगंबर जैन पंचकल्याणक प्रतिष्ठा महामहोत्सव सेवा समितीच्या जागेत 28 एप्रिल ते 4 मे या कालावधीत संपन्न होत आहे. या महोत्सवाची संपूर्ण तयारी झाली असल्याची माहिती महोत्सव समितीचे स्वागताध्यक्ष माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या महोत्सवासाठी भव्य दिव्य असा मंडप उभारण्यात आला आहे. महोत्सव कालावधी जेवण व्यवस्था विभाग, सजावट विभाग,वाहन पार्किंग विभाग, बैठक व्यवस्था विभाग ,प्रसिद्धी विभाग यासह विविध विभागामार्फत काम पाहण्यात येणार आहे. या महामहोत्सव कालावधी मिरवणुकीसाठी हत्ती घोडे असणार आहेत. लाखो भाविक या महामोहस्तवास हजेरी लावतील.यासाठी काटेकोर नियोजन करण्यात आले असल्याची माहिती महोत्सव कमिटीचे अध्यक्ष नरसगोंडा पाटील यांनी दिली.
हा महोत्सव यशस्वी पार पाडण्यासाठी पंच कमिटी मधील माजी नगरसेवक धनपाल तात्या खोत, प्रमोद पाटील, सुनील कवठेकर, सुनील पाटील, बाबासाहेब चिंचवाडे ,सचिन पाटील, महावीर रेवांना, वसंत संगमे, संदीप भोसेकर ,कुबेर खोत, शितल करणाळे शितल संगमे ,महावीर पाटील ,यासह वीर सेवा दल ,वीर महिला मंडळ ,सुधर्म सागर प्रतिष्ठान ,दिगंबर जैन सेवा समिती, व सकल जैन समाज कार्यरत रहाणार आहे.शेवटी आभार विजय खोत यांनी मानले.

