सध्या राज्याच्या राजकारणामधून एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा रद्द करण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतल्याची माहिती समोर आली आहे.
याचबरोबर ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल काँग्रेस आणि सीपीआय या पक्षाचा देखील राष्ट्रीय दर्जा रद्द करण्यात आला आहे. याबाबत निवडणूक आयोगाने घोषणा केली आहे. निवडणूक आयोगाने पक्षाचा राष्ट्रीय दर्जा काढल्याने शरद पवारांसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

