• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

हसन मुश्रीफ यांच्या अटकपूर्व जामीनावर मोठी अपडेट; ‘या’ तारखेला होणार फैसला

Admin by Admin
April 5, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
हसन मुश्रीफ यांच्या अटकपूर्व जामीनावर मोठी अपडेट; ‘या’ तारखेला होणार फैसला
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर 11 एप्रिलला सुनावणी होणार आहे. तोपर्यंत मुश्रीफांना अटकेपासून दिलेलं संरक्षण कायम असणार आहे. न्यायमूर्ती एम जी देशपांडे यांचं कोर्ट या प्रकरणावर निर्णय देणार आहे. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना तसेच कोल्हापूर जिल्हा सहकारी बँक यामध्ये कथित गैरव्यवहार केल्याचा आरोप हसन मुश्रीफ यांच्यावर आहेत.

ज्येष्ठ वकील अमित देसाई, आबाद पोंडा, प्रशांत पाटील यांनी हसन मुश्रीफ यांची बाजू मांडली होती. तर ईडीच्या वतीनं सुनील गोंसालवीस यांनी जोरदार विरोध केला होता. विशेष पीएमएलए कोर्ट न्यायाधीश एमजी देशपांडे यांच्या कोर्टात सुनावणी झाली होती. मुश्रीफ यांच्यावर सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यात आर्थिक अफरातफर केल्याचा आरोप आहे. कथित भागधारक शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचाही ठपका यात ठेवण्यात आला आहे. अनैतिक मार्गानं पैसे वळवून, मनी लाँड्रीन्ग केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. निकालाचं वाचन अद्याप अपूर्ण आहे.

हसन मुश्रीफ यांची गेल्या तीन आठवड्यांमध्ये तब्बल तीन ते चार वेळा चौकशी झाल्याची माहिती समोर आली आहे. मुश्रीफांनी स्वत: गेल्या आठवड्यात सात तासांच्या चौकशीनंतर आपण ईडी कार्यालयात चौथ्यांदा आल्याची माहिती दिली होती. याशिवाय आपण ईडी अधिकाऱ्यांना सहकार्य केले. ईडी अधिकाऱ्यांचा एकही प्रश्न आपण टाळला नसल्याची प्रतिक्रिया हसन मुश्रीफ यांनी दिली.

हसन मुश्रीफ यांनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन याचिकेवर कोर्टात दोन दिवसांपूर्वी युक्तिवाद पार पडलेला. या प्रकरणी न्यायाधीशांनी दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेतला. या प्रकरणी विशेष पीएएमएलए कोर्टात सुनावणी झाली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाल्याने या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाल्याचं स्पष्ट करण्यात आलं. पण कोर्टाने या प्रकरणाचा तातडीने निकाल जाहीर केला नाही. कोर्टाने या प्रकरणाचा निकाल राखून ठेवला. तसेच येत्या 5 एप्रिलला याबाबतचा निकाल देणार असल्याचं कोर्टाने स्पष्ट केलं होतं. यावर आता 11 एप्रिलला सुनावणी होणार आहे.

 

https://www.youtube.com/@GopniyKhabaryaLive

Previous Post

कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठी कारवाई

Next Post

“हे सरकार काही महिन्यांचं नाही, काही दिवसांचं नाही तर काही तासांच….”, आदित्य ठाकरे यांचं भाकीत

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
“हे सरकार काही महिन्यांचं नाही, काही दिवसांचं नाही तर काही तासांच….”, आदित्य ठाकरे यांचं भाकीत

“हे सरकार काही महिन्यांचं नाही, काही दिवसांचं नाही तर काही तासांच….”, आदित्य ठाकरे यांचं भाकीत

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group