• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

विधान परिषदेत आमदार बनले ; विजयोत्सवाच्या रॅलीत खिशातून ७५ हजार हाणले..!

Admin by Admin
February 3, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, मंत्रालय, राजकीय, विशेष
1 min read
0
विधान परिषदेत आमदार बनले ; विजयोत्सवाच्या रॅलीत खिशातून ७५ हजार हाणले..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

मुंबई – विधान परिषदेच्या ५ जागांचे निकाल हाती आलेत. या निवडणुकीत विजयी उमेदवारांकडून विजयोत्सव साजरा करण्यासाठी जंगी रॅली काढण्यात येत आहे. अनेक ठिकाणी ढोल ताशे, गुलाल उधळले जात आहेत.

कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. त्यात कोकण शिक्षक मतदारसंघातून विजयी झालेले भाजपा उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांना विजयोत्सवाचा चांगलाच फटका बसला आहे.

नेहमी गर्दीच्या ठिकाणी चोरांची टोळी सक्रीय होते परंतु आता स्पेशल इलेक्शनमधील विजयोत्सव साजरा करण्यासाठी होणाऱ्या गर्दीतही चोर हात साफ करतायेत का असा प्रश्न उभा राहतो. कोकण शिक्षक मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या विजयानंतर काढण्यात आलेल्या रॅलीत चोरट्यांनी थेट ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या खिशातील ७५ हजार रुपये लंपास केल्याचं समोर आले आहे.

हा प्रकार समजताच म्हात्रे यांनी मतमोजणी केंद्रावरील पोलीस कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. याबाबत आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे म्हणाले की, निवडणुकीची मतमोजणी ज्याठिकाणी होती त्याठिकाणी कार्यकर्त्यांनी जल्लोषात मला उचलून घेतले त्यावेळी माझ्याकडे खर्चासाठी काही पैसे होते. मागील खिशात २५ हजार आणि पुढच्या खिशात ५० हजार रुपये हे पैसे कुणीतरी लंपास केले. हा प्रकार लगेच माझ्या लक्षात आला असं त्यांनी सांगितले.

माझ्या दोन्ही खिशातून पैसे गेल्यानं मी कार्यकर्त्यांना अलर्ट केले. पण मला वाटलं नव्हतं असं काही होईल. ऐनवेळी कार्यकर्त्यांच्या जेवणासाठी इतर खर्चासाठी ही रक्कम माझ्या खिशात होती असं ज्ञानेश्वर म्हात्रे म्हणाले. त्यामुळे इलेक्शनच्या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांची टोळी विजयी रॅलीत सक्रीय होती हे उघड झाले आहे. याबाबत पोलिसांनी तक्रार नोंदवली असून त्याचा तपास सुरू आहे.

Previous Post

वाऱ्याने द्राक्षबाग भुईसपाट ; पंधरा लाखांचे नुकसान.

Next Post

पोलीस ठाण्यात घेऊन गेला बायको हरवल्याची तक्रार ; “ती होती तिथे”, ह्याच्या हातात बेड्या अन् आरोपी झाले घरदार.!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
प्रजासत्ताक दिनीच महिला शिक्षकेचा दोन शिक्षकाकडून विनयभंग, गुन्हा दाखल

पोलीस ठाण्यात घेऊन गेला बायको हरवल्याची तक्रार ; "ती होती तिथे", ह्याच्या हातात बेड्या अन् आरोपी झाले घरदार.!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group