मिरज : खबऱ्या प्रतिनिधी/ मिरज पंचायत समितीत नव्यानेच रुजू झालेले बीडीओ सतिश पाटील हे २५ डिसेंबर रोजी हजर होवून अवघ्या काही दिवसाचा कार्यभार करून रजेवर गेल्याने पंचायत समिती परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. बीडीओ सतिश पाटील यांचे मन मिरजेत रमेनासे झाले असल्याचे नागरीकातून बोलले जात आहे.
मिरज पंचायत समिती जिल्ह्यातील मोठी पंचायत समिती म्हणून ओळखली जाते. तालूक्याचा विस्तार मोठा असल्याने नागरीकांची कामासाठी नेहमीच पंचायत समितीत गर्दी दिसून येते. बीडीओ सतिश पाटील हे रजेवर गेल्याने पंचायत समिती ओस पडलेली दिसून येत आहे. तालूक्यातून आपल्या कामासाठी येणाऱ्या प्रत्येक नागरीकाचा पैसा व वेळ वाया जात आहे. तत्कालीन बीडीओ यांनी कोरोना, महापूर अशा संकटाच्या काळात उत्तम प्रकारे काम केले असतानाही त्यांची बदली करण्यात आली, त्यांच्या जागी रुजू झालेले बीडीओ हे केवळ १० ते१२ दिवसां-साठीच पंचायत समितीत दिसून आले. ते रजेवर गेल्याने पंचायत समितीच्या सर्व विभागाची कामे ठप्प होणार आहेत. त्यामूळे तालुक्यातील नागरिकांना केवळ हेलपाटे मारण्याशिवाय कोणताच पर्याय राहणार नाही.
त्यामूळे जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून मिरज पंचायत समितीस कायमस्वरूपी सक्षम बीडीओची नेमणूक करण्याची मागणी तालूक्यातील नागरिकामधून होत आहे.

