• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

जिंदाल कंपनीमध्ये स्फोट ; भीषण आगीचा लोट..!

Admin by Admin
January 1, 2023
in क्राईम
1 min read
0
जिंदाल कंपनीमध्ये स्फोट ; भीषण आगीचा लोट..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

इगतपुरी, 1 जानेवारी : नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरीमध्ये मुंडे गावाजवळ जिंदाल कंपनीमध्ये भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे, तर 15 कर्मचारी जखमी झाले आहेत.

जखमींमध्ये दोन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. महिमा वय वर्ष 20 आणि अंजली वय वर्ष 27 अशी मृत्यू झालेल्या दोन महिला कर्मचाऱ्यांची नावं आहेत. जिंदाल कंपनीमध्ये बॉयलरचा स्फोट झाल्यामुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आग लागल्यानंतर लगेचच घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झालं.

तसंच अपघाताचं गांभीर्य पाहता लष्करालाही पाचारण करण्यात आलं. भारतीय लष्कराच्या सदर्न कंमाडने या आगीचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या व्हिडिओवरून आगीची दाहकता दिसत आहे.

मुख्यमंत्र्यांकडून पाहणी

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची पाहणी केली.तसंच मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्री दादा भुसे, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार आणि स्थानिक आमदारांनीही घटनास्थळाची पाहणी केली. ‘घडलेली घटना गंभीर आहे.

ज्वलनशील पदार्थ असल्यामुळे आग भडकली. आपली यंत्रणा काम करत आहे. जखमींमध्ये दोन जण अती गंभीर आहेत. मोठ्या प्रमाणात आग भडकली, मी तेव्हा सगळ्यांशी संपर्कात होतो.

लष्कराची टीमही दाखल झाली आहे,’ असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ‘सध्या आग नियंत्रणात आहे, संपूर्ण आग विझवली जाईल. जखमींवर शासकीय पैशांनी उपचार होतील. मी जखमींची भेट घेतली आहे, डॉक्टरांनाही भेटलो आहे. संपूर्ण उपचार करण्याचे निर्देश दिले आहेत. या घटनेची उच्च स्तरीय चौकशी केली जाईल, यानंतर माहिती समोर येईल. सध्या इथे कुणीही अडकल्याची शक्यता कमी आहे,’ अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

Previous Post

“… तर शिंदे फडणवीस सरकार कधीही कोसळू शकतं.?” महाविकास आघाडीतील “या” नेत्याने स्पष्ट सांगितलं.

Next Post

थर्टी फर्स्ट ला नशेचा ओव्हरडोस, तब्बल एक कोटींचा ड्रग्स जप्त ; १६ नायजेरियन ताब्यात.

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
थर्टी फर्स्ट ला नशेचा ओव्हरडोस, तब्बल एक कोटींचा ड्रग्स जप्त ; १६ नायजेरियन ताब्यात.

थर्टी फर्स्ट ला नशेचा ओव्हरडोस, तब्बल एक कोटींचा ड्रग्स जप्त ; १६ नायजेरियन ताब्यात.

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group