• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

“पवारांच्या घरातच उभी फूट”; गोपीचंद पडळकर यांचा खळबळजनक दावा.

Admin by Admin
November 14, 2022
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
हज यात्रेकरूंना दिलासा : खर्चात एक लाख रुपयांची कपात : वयोमर्यादेची अटही संपुष्टात.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली : राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सांगली जिल्ह्यातील संघटनेची परिस्थिती वाईट आहे. राष्ट्रवादीला तर शाखेपासून सुरुवात करण्याची वेळ आली आहे. एखाद्या रुग्णाला संधिवात झाल्यावर सूज येते.

तशी सूज राष्ट्रवादीला गेल्या अडीच वर्षांत आली होती. पण, सरकार गेल्यानंतर ती सूज आता एका झटक्यात ओसरून गेली आहे, अशी टीका भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर केली आहे. ते सांगलीत भाजपाच्या एका कार्यक्रमात बोलत होते.

गोपीचंद पडळकरांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावरही हल्लाबोल केला आहे. “सांगली हा प्रदेशाध्यक्षांचा जिल्हा असून, ते स्वत:च निवडून येऊ शकतात. तासगावमध्ये सुमन पाटील आणि शिराळ्यात मानसिंगराव नाईक हे त्यांच्या हिंमतीवर निवडून येतात. जयंत पाटील यांच्या पाठीमागे फक्त प्राजक्त तनपुरे आहे, बाकी कोण नाही,” असा टोला गोपीचंद पडळकर यांनी मारला आहे.

“सत्तेत असताना राष्ट्रवादीला भाजपाचा एकही आमदार फोडता आला नाही. भाजपा हा विचारांवर प्रेरित होऊन काम करणारा पक्ष आहे. मात्र, सरकार गेल्यावर इतकी चुळबूळ झाली की, पवार घराण्यातच फूट पडते, असं वातावरण निर्माण झालं. तुम्ही राज्यातली एवढी घर फोडली आहे, त्यामुळे जे पेरलं तेच उगवणार आहे. निवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेसला घरी बसवल्याशिवाय राहणार नाही,” असा निर्धारही गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.

Previous Post

गुगवाडमध्ये धम्मभूमीचे लोकार्पण; हजारोंनी घेतली बौद्ध धर्माची दीक्षा

Next Post

Gas Cylinder Price : ग्राहकांना मोठा धक्का ! सरकारने गॅसच्या दराबाबत घेतला निर्णय, आता मोजावे लागणार अधिक पैसे

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
Gas Cylinder Price : ग्राहकांना मोठा धक्का ! सरकारने गॅसच्या दराबाबत घेतला निर्णय, आता मोजावे लागणार अधिक पैसे

Gas Cylinder Price : ग्राहकांना मोठा धक्का ! सरकारने गॅसच्या दराबाबत घेतला निर्णय, आता मोजावे लागणार अधिक पैसे

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group