• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

विठुरायाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या वारकऱ्यांवर काळाचा घाला ; ७ जण मृत्युमुखी

Admin by Admin
November 1, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
विठुरायाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या वारकऱ्यांवर काळाचा घाला ; ७ जण मृत्युमुखी
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

कवठेमहांकाळ (खबऱ्या प्रतिनिधी) – कार्तिकी वारीसाठी पंढरपूरला जाणार्‍या वारकर्‍यांवर काळाने घाला घातला आहे. मिरज-पंढरपूर महामार्गावर जुनोनी येथे पायी दिंडीत कार घुसल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात सात वारकर्‍यांचा कारखाली चिरडून मृत्यू झाला असून, सहा वारकरी गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील सर्व वारकरी कोल्हापूर जिल्ह्याच्या करवीर तालुक्यातील जठारवाडी गावातील आहेत. कार्तिकी एकदशीनिमित्त ३२ वारकरी विठूरायाच्या दर्शनाला पायी पंढरपूरला जात होते, तेव्हा हा अपघात घडला. या घटनेने हळहळ व्यक्त होत असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून मदत कार्याची माहिती घेतली. राज्य सरकारकडून तातडीने पाच लाख रुपयांच्या मदतीची घोषणा करण्यात आली आहे.

करवीर तालुक्यातील जठारवाडी गावातील विठ्ठल भक्त मंडळाच्यावतीने पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. सांगोला तालुक्यातील जुनोनी गावाजवळ आज सायंकाळी सात वाजता एक भरधाव कार थेट दिंडीत घुसली. या अपघातात तब्बल १५ वारकरी गंभीर जखमी झाले होते. यातील ७ जणांचा मृत्यू झाला असून, ८ जण गंभीर जखमी आहेत. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये पाच महिला, एक पुरुष आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. वारकर्‍यांना धडक देणार्‍या टाटा नेक्सॉन कारमधील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, कारमधील व्यक्ती या सांगोला तालुक्यातील सोनंद या गावातील रहिवासी आहेत. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच जठारवाडी गाव शोकसागरात बुडाला. अपघातामधील मृतांची नेमकी नावे समजत नसल्यामुळे गावातील लोकांची घालमेल झाली होती. काही ग्रामस्थ अपघाताची माहिती मिळताच सांगोल्याकडे रवाना झाले होते. या घटनेने कार्तिकी यात्रेवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर अपघातातील सर्व जखमींना उपचारासाठी शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पंढरपूरकडे पायी निघालेल्या वारकर्‍यांना सांगोला-मिरज मार्गावर वाहनाने चिरडल्यामुळे झालेल्या दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये तातडीच्या मदतीचीदेखील त्यांनी घोषणा केली आहे. मुख्यमंत्र्यांनी व विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हे वृत्त कळताच तातडीने जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला. तसेच या घटनेतील जखमी वारकर्‍यांना ताबडतोब योग्य ते उपचार देण्यात यावे, असे निर्देश दिले. हा अपघात कसा झाला याविषयी तातडीने चौकशी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

– मृतांची नावे पुढील प्रमाणे –

१.शारदा आनंदा घोडके ६१ वर्ष
२.सुशीला पवार
३.रंजना बळवंत जाधव
४.गौरव पवार १४ वर्ष
५.सर्जेराव श्रीपती जाधव
६.सुनिता सुभाष काटे
७.शांताबाई शिवाजी जाधव
—
– जखमींची नावे –
१. अनिता गोपीनाथ जगदाळे
२. अनिता सरदार जाधव
३. सरिता अरुण सीयेकर
४. शानुताई विलास सीयेकर
५. सुभाष केशव काटे
———–

Previous Post

सांगलीच्या सराफाची कोल्हापुरात आयकर अधिकारी असल्याचे भासवून ८० लाखांची लूट ; दोघेजण ताब्यात.

Next Post

आटपाडीत वारकऱ्यांच्या दिंडीत कार घुसली ; ३ वारकरी जखमी.

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
आटपाडीत वारकऱ्यांच्या दिंडीत कार घुसली ; ३ वारकरी जखमी.

आटपाडीत वारकऱ्यांच्या दिंडीत कार घुसली ; ३ वारकरी जखमी.

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group